शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लागले तर  पोलिसांना जबाबदार धरणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:50 IST

जर कोणत्या धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : मुंबईतील १ हजार ६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. त्यात १,१४९ मस्जिद, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारा तसेच १४८ इतर ठिकाणांचा देखील समावेश आहे. यामुळे मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

राज्यात १,७५९ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत ३,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यानंतर जर कोणत्या धार्मिक स्थळांवर पुन्हा भोंगे लावण्यात आले तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. तक्रारकर्त्यास दंडाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याच्या सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू. तसेच याबाबत ध्वनीप्रदूषण विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरारीपथकही स्थापन करू असेही फडणवीस म्हणाले.

रोज सकाळी वाजणाऱ्या १० च्या भोंग्याचे काय? अनिल पाटील यांनी यावेळी इतर भोंगे बंद झाले, पण रोज सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या भोंग्याचे काय, असा सवाल खा. संजय राऊत यांचे नाव न घेता केला. त्यावेळी आपली एकच अडचण आहे, ध्वनीप्रदूषणाचा कायदा आहे पण विचाराच्या प्रदूषणाचा कायदा अद्याप व्हायचा आहे तो होईल तेव्हा त्यावर विचार करू, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. भोंगे काढल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच, दहीहंडी, गणेशोत्सवात तात्पुरते मंडप उभारले जातात. त्यांना परवानगी देताना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.    

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस