शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच

By admin | Updated: December 30, 2014 22:26 IST

ख्रिसमसपाठोपाठ सर्वांनाच वेध लागतात ते थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांकडून विविध बेत आखले गेले आहेत.

पनवेल : ख्रिसमसपाठोपाठ सर्वांनाच वेध लागतात ते थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांकडून विविध बेत आखले गेले आहेत. पनवेलसह नवी मुंबईतील सर्व हॉटेल्स, बँक्वेट्स हॉल्स, फार्म हाऊसेस आदींचे बुकिंग झाले आहेत. विशेष म्हणजे पनवेल व परिसरातील बहुतांश गृहसंकुलांमध्येही नववर्ष स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे.पनवेल तालुक्यात अडीचशेहून अधिक फार्म हाऊसेस, रिसॉर्ट्स आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही मोठे असते. याला आळा घालण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. त्याकरिता ज्या ज्या ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे, मग ते हॉटेल्स, रिसॉर्ट्स, बँक्वेट्स, फार्म हाऊस असो वा हाऊसिंग सोसायटी, सर्वांनाच पोलीस परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजन करताना संबंधितांनी लिकर दारु परवाना, डीजे साऊंड सिस्टीमचा परवाना, आदी ना हरकत परवाना पोलिसांकडून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय ३१ डिसेंबरच्या रात्री ९ पासून ते १ जानेवारी पहाटेच्या ५ वाजेपर्यंत पार्टीचे आयोजन करण्यास संमती दिली आहे. त्याचबरोबर थर्टी फर्स्टच्या दिवशी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर व मुली-महिलांची छेडछाड काढणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिमंडळ-२ चे उपायुक्त संजयसिंह येनपुरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल व आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातही संपूर्ण पोलीस दल सज्ज झाले आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्ट साजरा करताना कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पनवेल परिसरातील हद्दीमध्ये ३१ डिसेंबर रोजी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी फिक्स पॉर्इंट, नाकाबंदी, बिट मार्शल पेट्रोलिंग, पोलीस ठाण्याकडील पीटर मोबाइल, सी आर मोबाइल तसेच महिला पेट्रोलिंगचा वापर करण्यात येणार असून वाहतूक शाखेकडून देखील पनवेल परिसरातील विविध रस्त्यांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्यांनी दारु सेवन करून वाहन चालवू नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. थर्टीफर्स्टसाठी लावण्यात आलेल्या या बंदोबस्तादरम्यान मोकळ्या जागा, हातगाडी, मैदाने, बाग बगिचे, छोटे धाबे येथे गस्त घालण्यात येणार आहे. अशा ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.पनवेल तालुक्यातील नेरे, वाजापूर तसेच कर्नाळा, खालापूरमध्ये चौक आणि कर्जत तालुक्यात धनदांडग्यांचे मोठ्या प्रमाणात फार्महाऊसेस आहेत. त्याचबरोबर अलिबाग, माणगाव, रोहे, पाली या भागातही फार्म हाऊसेसची संख्या मोठी आहे. पनवेल आणि कर्जतमध्ये सलमान खान, राखी गुलजार, ऋतिक रोशन आदी सेलिब्रिटींचे फार्म हाऊस आहेत. तसेच बिल्डर, व्यावसायिक, उच्चपदस्थ अधिकारी यांचे फार्म हाऊस या भागात आहेत. वीकेन्ड, सुट्टीच्या दिवशी संबंधित मंडळी याठिकाणी विरंगुळ्यासाठी येतात. परिसरात गेल्या काही वर्षांत फार्म हाऊसचे पेव वाढले असून याठिकाणी जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. सुरक्षा दल तैनात : उत्साहाच्या भरात खोल समुद्रात न जाण्याचा इशारा अलिबाग : नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांची व नागरिकांची फुलले आहेत. मात्र उत्साहाच्या भरात परिसरात अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आनंदोत्सवाच्या भरात खोल समुद्रात जाऊ नये व जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.जिल्ह्यातील किनारी भागातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींना किनाऱ्यांवर सूचना फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र किनाऱ्यावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णवाहिका, बचाव साहित्य, बोट, लाइफ गार्ड आदी सुविधा उपलब्ध करु न द्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय लाइफबोयाज, टॉर्च आदी उपलब्ध करुन देणे, नागरी संरक्षण दल व गृहरक्षक दलाकडील स्वयंसेवकांना जीवरक्षक म्हणून ठेवण्यात यावे, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी सुरक्षा जॅकेट, बोटी, सुरक्षारक्षक व संसाधने उपलब्ध ठेवावीत, कोस्ट गार्डने बोटी, लाइफ जॅकेट, डायव्हर्स उपलब्ध करावेत, बीचवर पर्यटकांना जाण्यासाठी वेळ निश्चित करावी आदी सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी भांगे यांनी सांगितले.हॉटेल व इतर पार्टीच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार होवू नयेत यासाठी साध्या वेषातील पथक नेमण्यात येणार आहे. हॉटेलमधील महिलांच्या छेडछाडीचे प्रकार होवू नयेत यासाठी हॉटेल व्यावसायिकांना खास सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये व कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार आढळून येतील अशा हॉटेल मालकांच्या वाढवून देण्यात येणाऱ्या वेळेची परवानगी त्याचवेळी रद्द करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने पनवेल व इतर पोलीस ठाण्यांच्या वतीने थर्टीफर्स्टनिमित्त आयोजित कार्यक्रमावर वॉच ठेवणार असल्याने नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करावे, कुणीही दारु सेवन करून वाहन चालवू नये असे आवाहन नवी मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. उरणच्या पिरवाडी बीचवर पर्यटकांची गर्दी उरण : सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आबालवृध्दांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी तरुणांबरोबरच गृहिणी, ज्येष्ठांकडून इतकेच नव्हे तर बच्चे कंपनीकडून विविध बेत आखले जात आहे. उरण येथील पिरवाडी बीचवर सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी, नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दोन दिवसांपासून पर्यटकांची चांगलीच गर्दी उसळली आहे.उरण शहरापासून एक किमी अंतरावर पिरवाडी समुद्र किनारा आहे. निसर्गरम्य वातावरण, समुद्राच्या डोंगरा एवढ्या उठणाऱ्या लाटा, फेसाळलेला समुद्र आणि नजर पोहचेल तिथपर्यंत किनाऱ्यावरील सोनेरी - रुपेरी वाळू तरुणाई व हौसी पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडतो. सुट्टीचा आनंद लुटण्याचा आणि हौशी पर्यटकांना समुद्रात पोहण्याचा मोह याठिकाणी आवरताच येत नाही. त्यामुळे दरवर्षी या बीचवर हजारो तरुणाई, पर्यटकांची चांगलीच गर्दी उसळते. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी यंदा पीरवाडी किनारा हौशी पर्यटक आणि उत्साही तरुणाईने अगदी फुलून गेला आहे.अर्नाळा, अक्सा बीच, जुहू चौपाटी, घारापुरी, वसई, मुरुड, गणपतीपुळे, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, अलिबाग, पिरवाडी बीच आदी सागरी किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. मात्र अशी मोहात टाकणारी समुद्र किनाऱ्यावरील अनेक पर्यटन स्थळे हौशी पर्यटकांसाठी काळ ठरु लागली आहेत. धोक्याच्या सूचना देणाऱ्या फलकांंकडे बेफिकिरीने दुर्लक्ष केल्याने पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागतो. त्यामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहात करताना परिस्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पर्यटकांना माथेरानची भुरळखालापूर : देशभरातून आलेल्या पर्यटकांच्या गर्दीत माथेरानचे रस्ते फुलून गेले आहेत. देशातील पर्यटकांसह जपान, कोरिया, सिंगापूर, युरोपसारख्या देशातूनही पर्यटक मोठ्या संख्येने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. पर्यावरण खात्याचे अत्यंत कडक निर्बंध असूनही पर्यटन क्षेत्रात आपली जगावेगळी ओळख निर्माण करणारे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणजे जगातील एकमेव व अव्दितीय आहे.माथेरान हे उच्च व मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे ठिकाण असल्याने वीकेंड किंवा सार्वजनिक सुटीच्यावेळी अनेकांची पावले माथेरानकडे वळतात. त्यात नववर्षाच्या स्वागताच्या आनंदाची मजा लुटण्यासाठी अनेक पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. माथेरानकर पर्यटकांना परवडणाऱ्या भावात सोयी आणि सुविधा पुरवण्यासाठी उत्सुक असल्याचे शहरभर दिसत आहे.माथेरानची राणी असलेली मिनीट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरून घाट चढत आहेच सोबत शेकडो टॅक्सी घाटात एकामागोमाग फेऱ्या मारून पर्यटकांची ने-आण करताना दिसतात. घोडेस्वारीबरोबरच हातगाडीचा पर्याय पर्यटकांसाठी याठिकाणी खुला असला तरी पायी चालणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेणाऱ्यांना अ‍ॅडव्हेंचर स्पोटर््सची भेट देण्यासाठी अनेक हॉटेलचालकांनी जोरदार तयारी केली आहे. च्यंदाचा मोसम माथेरानकरांच्या उत्पन्नात भर टाकणारा असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. माथेराननगर पालिका काही वर्षापूर्वी नववर्षाच्या स्वागतासाठी रंगारंग करमणूकीच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करत असे परंतू ती परंपरा खंडित झाल्याची खंत अनेक पर्यटक व्यक्त करत आहेत.