शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला नडला आमदाराशी पंगा!

By admin | Updated: February 8, 2016 04:11 IST

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम करत असताना, मंत्री व लोकप्रतिनिधींशी वाद घालण्याच्या फटका मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश कासले यांना बसला आहे.

जमीर काझी,  मुंबईकायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम करत असताना, मंत्री व लोकप्रतिनिधींशी वाद घालण्याच्या फटका मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश कासले यांना बसला आहे. सेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्याशी वादावादी झाली होती. या प्रकरणात परब यांना अवमानकारक वागणूक दिल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे कासले यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.आमदाराशी वाद घातल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होण्याची ही मुंबई पोलीस दलातील पहिलीच घटना आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधींना सौजन्य व सन्मानपूर्वक वागणूक देण्याची सूचना, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी केली होती. त्याबाबत जारी केलेल्या नियमावलीच्या आधारे कासले यांना दोषी ठरवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचा परिणाम अन्य पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सध्या विशेष शाखा-१मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ निरीक्षक नरेश कासले २०१४मध्ये उत्तर प्रादेशिक विभागातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या वेळी केबल नेटवर्कमधील जगजीतसिंग कोहली यांच्या कंपनीतील, सेटटॉप बॉक्स मालमत्तेतील चोरीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४०९, ५०६(२), ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये संतोष अकोलकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यांची अटक टळावी, यासाठी सेनेचे आमदार अनिल परब प्रयत्न करत होते. पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबत कासले तपास अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. परब हे तपासकामात हस्तक्षेप करत असल्याचा समज होऊन कासले यांनी त्यांना सुनावले. लोकप्रतिनिधी असला तरी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सांगत असताना त्यांच्याशी हुज्जत घातली. जोरदार वादावादीमुळे पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला होता. अ‍ॅड. परब यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. दोघांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कासले यांची त्या पोलीस ठाण्यातून विशेष शाखा-१मध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक कासले यांच्यावर कारवाईची नोंद सेवा पटलावर होत असल्याने, त्याचा परिणाम पदोन्नती व अन्य अ‍ॅवॉर्डवेळी होणार आहे. त्यामुळे या शिक्षेविरुद्ध त्यांना ‘मॅट’मध्ये धाव घ्यावी लागेल. मात्र, अशा प्रकारची शिक्षा आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी नियमानुसार काम करत असलो, तरी मंत्री, आमदार-खासदारांशी आता वाद घालायचे नाहीत. अशा वेळी कोणी वरिष्ठ पाठीशी राहात नाहीत. त्यामुळे ‘दबंग’गिरी न दाखविता, जितके जमते तितके काम करायचे, अशी मानसिकता अधिकाऱ्यांची होत असल्याचीच आज दिवसभर चर्चा पोलीस वर्तुळात होती.