शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

पोलीस पाटलाने केले अत्याचार

By admin | Updated: October 24, 2015 03:57 IST

रत्नागिरीच्या एका खेड्यातील १५ वर्षीय मुलीवर गावच्या पोलीस पाटलासह तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

मुंबई : रत्नागिरीच्या एका खेड्यातील १५ वर्षीय मुलीवर गावच्या पोलीस पाटलासह तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर, याप्रकरणी पोलीस पाटलासह तिघांविरुद्ध बलात्कार, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळची रत्नागिरी येथील राजापूरमध्ये राहणारी तक्रारदार १५ वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत राहते. त्याच गावातील पोलीस पाटीलांसह तिच्या काका आणि अन्य एक साथीदाराने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने झालेला घटनाक्रम सांगितला. मात्र बदनामीच्या भीतीने तिच्या कुटुंबियांनी तक्रार न करताच मुंबईतील नातेवाईकांकडे धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने तिला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. रुग्णालय प्रशासनाकडून भोईवाडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीच्या तक्रारीनुसार, गावच्या पाटलासह तिचा काका आणि अन्य एका साथीदाराविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा राजापुर पोलिसांकडे वर्ग केलाआहे. (प्रतिनिधी)