शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडूनच हवालदारालाच धमकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 05:11 IST

पोलीस हवालदाराला अन्य एका पोलिसानेच त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करत समाजसेवा करु नकोस, असे धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार

मुंबई : पोलीस दलातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारावर आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदाराला अन्य एका पोलिसानेच त्याच्या घरी जाऊन शिवीगाळ करत समाजसेवा करु नकोस, असे धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी वरळीतील पोलीस वसाहतीत घडला. भरत सीताराम आगवणे असे धमकी देणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. आगवणेविरुद्ध हवालदार सुनील टोके यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणवेषात एका पोलिसाच्या घरात जाऊन धमकावण्याच्या या अजब प्रकाराची चर्चा दिवसभर पोलीस वर्तुळात होती. आगवणेनींदेखील टोके यांना शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे सुनील टोके सशस्त्र दल (एल-३) वरळी येथे कार्यरत आहेत. आगवणेही याच ठिकाणी नियुक्तीला आहेत. पोलीस हवालदार तुषार तिऊरवडे व संतोष कदम यांनी एका तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना ‘लोकमत’ने आधीच चव्हाट्यावर आणली आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या तरुणीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. टोके हे पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करत आहेत. त्याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकत असल्याने हवालदार आगवणे हे गणवेषात सकाळी पावणेदहाच्या सुमारास वरळी पोलीस वसाहतीतील टोके यांच्या घरी गेले. त्यावेळी टोके यांना शिवीगाळ करीत पत्नी आणि मुलाकडे त्यांच्याबद्दल विचारणा केली. आवाजाने टोके आतून बाहेर आले असता, ‘तुला पोलीस खात्यात नोकरी करायची नाही का? भ्रष्टाचार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात का भांडत आहेस, पीडित तरुणीला मदत करु नकोस अन्यथा तुला बघून घेऊ, समाजसेवेचा नाद सोडू दे, अन्यथा अनेक आरटीआय कार्यकर्ते, समाजसेवक यांचे काय झाले माहित आहे ना?’, अशा थेट धमक्या दिल्या. या धमकावण्यामुळे चिडून टोके यांचा मुलगा प्रणव व शेजाऱ्यांनी त्याला दरडावून जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर आवगणे तेथून निघून गेले. हवालदार टोके यांनी तातडीने हा प्रकार वरिष्ठ निरीक्षक व उपायुक्तांना सांगून त्यांच्या सुचनेनुसार वरळी पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात जाऊन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचे रिडर निरीक्षक अनावकर यांनी तुम्ही रितसर अर्ज द्या, असे सांगून त्यांना परत पाठवून दिले. (प्रतिनिधी)>शिवीगाळ केलीगणवेषात एका पोलिसाच्या घरात जाऊन धमकावण्याच्या या अजब प्रकाराची चर्चा दिवसभर पोलीस वर्तुळात होती. आगवणेनींदेखील टोके यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.