शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला धमकी प्रकरण क्राइम ब्रँचकडे

By admin | Updated: March 7, 2017 05:00 IST

पोलीस हवालदार सुनील टोके यांना एका पोलिसाकडून ठार मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला

जमीर काझी,मुंबई- पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व गैरव्यवहाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदार सुनील टोके यांना एका पोलिसाकडून ठार मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला आहे. हवालदार टोके यांचा सोमवारी सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यांना धमकाविणारा हवालदार भरत आगवणे याच्याकडे उद्या चौकशी करण्यात येणार आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसाला सहकाऱ्याकडून धमकाविण्याची ही मुंबई पोलीस दलातील पहिलीच घटना आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या उन्हाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला. त्यानुसार साहाय्यक आयुक्त रमेश गावित यांनी याबाबत सोमवारी टोके यांचा सविस्तर जबाब नोंदविला. त्यात आगवणे याने ‘नोकरी गेल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तुझा पानसरे, दाभोलकर करणार आहेत’, असे धमकावल्याचे नमूद केले आहे. टोके यांनी वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे व संतोष कदम यांच्याकडून शोषण झालेल्या पीडित तरुणीला न्याय मिळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. तरुणीवरील अत्याचार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर ते वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झले. त्या रागाने कदम याचा मित्र हवालदार आगवणे याने बुधवारी टोके यांच्या घरी जाऊन दमदाटी केली. ‘तुला पोलीस खात्यात नोकरी करायची नाही का, भ्रष्टाचार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात का भांडत आहेस? पीडित तरुणीला मदत करू नकोस, अन्यथा तुला बघून घेऊ’ असे धमकावल्याची तक्रार आहे.>आयुक्तांकडून दखलटोके यांनी तातडीने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचे रीडर निरीक्षक अनावकर यांनी तुम्ही रीतसर अर्ज द्या, असे सांगून परत पाठविले होते. त्यामुळे हवालदार टोके यांनी यासंबंधीचा अर्ज व्हॉट्सअ‍ॅपवरून आयुक्तांना पाठविला होता.