शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेलू बाजार रस्त्यावर रंगलेल्या क्रिकेट सट्टय़ावर पोलिसांचा छापा!

By admin | Updated: May 2, 2016 01:50 IST

क्रिकेट सट्टय़ामध्ये वाशिम व अकोल्यामधील सट्टा बहाद्दरांचा समावेश.

वाशिम: गत काही दिवसांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामने सुरू आहेत. या क्रिकेट सट्टय़ावर अकोला व वाशिम पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा घालून २0 सट्टेबाजांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २0 लाख रुपयांचा माल जप्त केला असून, रात्री उशिरापर्यंत सट्टाबाजांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. सट्टय़ामध्ये वाशिम जिल्ह्यासह अकोला शहरातील ६ ते ७ जणांचा समावेश असल्याची माहिती अकोल्याचे परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी दिली. वाशिम शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या शेलू बाजार रोडवर क्रिकेटवर सट्टा सुरू असल्याची माहिती अकोला पोलिसांच्या पथकाला मिळाली. यावर तात्काळ कारवाई करीत पोलिसांनी रंगलेल्या क्रिकेट सट्टय़ावर छापा घातला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे सट्टेबाजांमध्ये एकच धावपळ उडाली. पोलिसांनी अकोला व वाशिम शहरातील मिळून २0 च्याजवळपास सट्टेबाजांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सट्टेबाजांकडून ४५ हजार रुपये रोख, ९0 च्यावर मोबाइल, लॅपटॉप, टॅब, इनोव्हा कार आदी साहित्य जप्त केले. आकोटमधील सट्टाकिंग नरेश भुतडा व त्याच्या सहकार्‍यांच्या मुसक्या आवळल्यानंतर अकोला पोलिसाद्वारे वाशिममध्ये जाऊन ही दुसरी कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईसंदर्भात परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींची यादीही मोठी आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालणार असून, त्यामुळे आरोपींची नावे कळू शकणार नाहीत, अशी माहिती दिली. अकोल्यातील ७ ते ८ सट्टेबाजांचा समावेशआकोट येथील कारवाईमुळे अकोल्यातील सट्टेबाज चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे अकोला शहराच्या बाहेर जाऊन क्रिकेट सट्टा लावण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. वाशिम शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या शेलू बाजार रोडवरील एका खासगी शाळेच्या इमारतीमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा सुरू असून, त्यामध्ये अकोल्यातील ७ ते ८ सट्टेबाजांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सट्टय़ावर छापा घालून, सट्टेबाजांना ताब्यात घेतले. या सट्टेबाजांकडून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.