शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चोरी प्रकरणातील पोलिसांचे पगार थांबविले

By admin | Updated: June 9, 2017 04:47 IST

पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचे पगार थांबविण्याची कारवाई कोल्हापूरच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथून सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचे पगार थांबविण्याची कारवाई कोल्हापूरच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने केली आहे. हे सातहीजण सांगली पोलीस दलात होते. त्यामुळे त्यांना तातडीने पकडा, असे आदेश सीआयडीने सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाला दिले आहेत. मिरजेतील बेथेलहेमनगर येथे गतवर्षी एलसीबीने झोपडीवजा घरातून तीन कोटीची रोकड जप्त करुन मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत ही रक्कम त्याने वारणानगर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. सांगली एलसीबीने तपासाच्या नावाखाली मैनुद्दीनला वारणानगरला नेले. त्यानंतर तिथे पुन्हा कोट्यवधीचे घबाड सापडले. यातील दीड कोटीची रक्कम जप्त केली होती. पण त्याचवेळी सुमारे सव्वानऊ कोटीची रोकड एलसीबीच्या पथकाने हडप केल्याचे तब्बल एक वर्षानंतर उघडकीस आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरच चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, कुलदीप कांबळे, दीपक पाटील, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा तपास सीआयडी करीत आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. >फरारी घोषितच्या हालचालीन्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर संशयित पोलीस शरण येतील, अशी सीआयडीला अपेक्षा होती. पण अजून एकही संशयित शरण आला नसल्याने सीआयडीकडून त्यांना फरारी घोषित करण्याच्या हालचाली सुरु आहेत.