शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

पोलीस ठाण्यात स्फोट

By admin | Updated: May 27, 2017 03:11 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी होणाऱ्या जंगी कार्यक्रमाची धांदल सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी सदर पोलीस ठाण्यात स्फोट झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी होणाऱ्या जंगी कार्यक्रमाची धांदल सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी सदर पोलीस ठाण्यात स्फोट झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली. मात्र, हा स्फोट घडवून आणलेल्या आरोपीने स्वत:चे नाव चिठ्ठीत लिहून ठेवल्याने अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर कुटुंब कलहामुळे तो मानसिक रुग्ण झाल्याचे आणि या अवस्थेतूनच त्याने हा स्फोट घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला विराम मिळाला. शहरातील अतिमहत्त्वाचा परिसर म्हणून ओळख असलेल्या सिव्हिल लाइन्समध्ये महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांच्या परिसरात सदर पोलीस ठाणे आहे. स्मार्ट पोलीस ठाण्याच्या संकल्पनेनुसार सदर ठाण्यात विविध प्रकारची कामे सुरू आहेत. येथे काम करणारे मुकेश निंबर्ते, अविनाश चौधरी आणि प्रतीक भेदे नामक मजूर पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागातील (उजवीकडे) हिरवळीवर दुपारी २.१५ वाजता जेवण करायला बसले. त्यांनी आपले टिफीन उघडले असतानाच जोरदार स्फोट झाला. त्यामुळे हादरलेल्या या तिघांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, स्फोटाचा जोरदार आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील मंडळी धावतच बाहेर आली. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी छोटा खड्डा पडला. बाकड्याचा काही भाग तुटला आणि कंपाउंड वॉलच्या पिलरला खड्डा पडला. आरोपी मुकेश अंभोरे याने बिसलरीच्या बाटलीत सुतळी बॉम्बमध्ये वापरली जाणारी बारूद भरून नोझलच्या आधारे पॅकिंग करून सदर ठाण्यात हा स्फोट घडवून आणला. आरोपी मुकेश अंभोरे याने २०१० मध्ये जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांच्या कक्षात (बार रूम) टायमरच्या साह्याने स्फोट घडवून आणला होता. त्याला पकडून पोलिसांनी सदर ठाण्यात आणताच मुकेश अनियंत्रित झाला. तो पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. बळाचा वापर करीत त्याला पोलिसांनी कसेबसे नियंत्रित केले.काय लिहिले आहे चिठ्ठीत? आरोपी मुकेशने लिहिलेल्या दोन्ही चिठ्ठीत काहीसा विचित्र मजकूर आहे. पहिल्या चिठ्ठीत त्याने ‘‘भारत सरकार के महिला कानून मे खामिया होने के कारण सोती हुयी पुलिस को जगाने के लिए बम विस्फोट करने के लिए मजबूर हूंवा हूं, मामला २० दिसंबर २००७ को कोर्ट मे जहर पिने वाले का है’, असे लिहिले आहे.स्फोटाची चौकशी सुरूआरोपी कुटुंब कलहामुळे त्रस्त झाला आहे. त्यातून तो मनोरुग्णासारखा वागतो. त्याने हे कृत्य केल्याचे जवळपास स्पष्ट झाले असले तरी आम्ही चौकशीचे सर्व पर्याय तपासत आहोत. - शिवाजीराव बोडखे, सहपोलीस आयुक्त, नागपूर