शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Updated: September 24, 2016 02:42 IST

छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शनिवारी २४ सप्टेंबरला आयोजन करण्यात आलेल्या शिवशाही संकल्प मेळावा

महाड : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शनिवारी २४ सप्टेंबरला आयोजन करण्यात आलेल्या शिवशाही संकल्प मेळावा आणि शाक्त राज्याभिषेक सोहळ्याला परिसरातील ग्रामपंचायतींनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी किल्ले रायगड आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून या परिसरात अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रायगड जिल्हा प्रशासनाने गुरुवारी रात्री १२ वा. पासून ५ आॅक्टोबरपर्यंत रायगड जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे गड परिसरात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आणि टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने शनिवारी किल्ले रायगडावर दंगामुक्त महाराष्ट्रासाठी शिवशाही संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यासह राज्यभरातील ४० मराठा संघटनांनी या मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. या मेळाव्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पद्धतीने राज्याभिषेक सोहळा आणि दंगामुक्त महाराष्ट्र संकल्प सोडण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तणपुरे भूषविणार असून शेकापचे आ. जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे आहेत. मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आरकरे, जमात-ए- इस्लामिक हिंद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तौफिक आस्लम, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुधीर भोसले याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. इतिहासकार श्रीमंत कोकाटे, सुभान अली शेख, अमोल मेटकरी आदि इतिहास विचारवंतांची यानिमित्त व्याख्याने होणार असून स. ९.३० ते दु. २.३० वा. पर्यंत हे कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमापूर्वी बौद्ध पद्धतीनेही राज्याभिषेक सोहळा होण्याची शक्यता आहे. याला काही शिवप्रेमी संघटना आणि परिसरातील काही ग्रा. पं. नी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गडाकडे जाणारे सर्व रस्ते व गडाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या कार्यक्रमाला पन्नास हजार शिवभक्त गडावर उपस्थित राहणार असल्याचे संकेत संयोजकांनी सांगितले आहे.मात्र पावसामुळे गडावर किती उपस्थिती राहते याकडे लक्ष लागून राहिले आहे.>शिवसमाधीवर बंदोबस्त किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी या शिवरायांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा उखडून दरीत फेकून देण्यात आला होता. त्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिवसमाधी परिसराला पोलीस तैनात आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू के ला आहे. महामार्गापासून रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहनांचीही तपासणी केली जात आहे.