शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

पोलीसच घेताहेत पोलिसाचा शोध

By admin | Updated: February 15, 2016 03:57 IST

वरिष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामामुळे हैराण झालेल्या एका परिविक्षाधीन (प्रोबेशनगरी) पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्येचा इशारा देणारे निनावी पत्र पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना पाठवले आहे.

जमीर काझी,  मुंबईवरिष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामामुळे हैराण झालेल्या एका परिविक्षाधीन (प्रोबेशनगरी) पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्येचा इशारा देणारे निनावी पत्र पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना पाठवले आहे. महासंचालकांनी तातडीने दखल घेऊन मुंबईतील १२ही परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांना त्या पोलिसाचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या हद्दीतील विभागाचे सहायक आयुक्त (एसीपी) व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना (सीनियर पीआय) प्रोबेशनरी उपनिरीक्षकांवर वॉच ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून शहर व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्यांत विशेष दक्षता घेतली जात आहे.मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यांत सुमारे ३ हजारांवर पोलीस उपनिरीक्षक आहेत. परिविक्षाधीन अधिकारी ४००वर आहे. त्यामुळे आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पीएसआयचा कसा शोध कसा घ्यायचा, या विवंचनेत वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे ते सर्वच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी कधी नव्हे इतक्या आपुलकीने वागत आहेत. प्रोबेशनरीची कैफियतया पत्रानुसार ठाणे अंमलदार गंभीर गुन्ह्यांचा तपास, अपमृत्यू प्रकरण, तक्रार अर्ज अशी महत्त्वाची कामे प्रोबेशनरी अधिकाऱ्यांवर सोपवतात. त्यामुळे त्यांना खूप मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. अनुभव नसूनही वरिष्ठांकडून येणाऱ्या कामाच्या दडपणामुळे मानसिक तणाव वाढत आहे. ज्या हेतूने खात्यात भरती झालो होतो, ती मानसिकता आता राहिलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आत्महत्येचे विचार मनात घोळू लागल्याचे या अधिकाऱ्याने पत्रात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रोबेशनरींना अंमलदाराची ड्युटी व गुन्ह्याचा तपास दिला जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी पत्रात केलेली आहे. त्यामुळे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्राद्वारे सूचना करून तातडीने खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.