शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: May 12, 2014 22:35 IST

बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू

जलंब: येथील पोलिस निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे निवासस्थानांमध्ये राहणार्‍या पोलिसांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानांकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे निवासस्थांनांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलंब येथे ब्रिटीश काळापासून पोलिस स्टेशन आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत ४0 खेड्यांचा समावेश आहे. यासर्व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून येथे ३५ पोलिस कर्मचारी व एक अधिकारी कार्यरत आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी २२ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र, उभारण्यात आल्यानंतर या निवासस्थानांची देखभालच करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता केवळ ५-६ निवासस्थानेच राहण्याजोगे आहेत. उर्वरीत सर्वच निवास्थानांना नरकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये बहुतांश निवासस्थानातील शौचालयाचे दरवाजे तुटले आहे. तर काही निवासस्थानाला दरवाजेच नाही. काही वर्षाअगोदर पोलिस निवासस्थानाची फक्त थातुरमातूर डागडुजीचे काम करण्यात आले होते. एक ना अनेक समस्या असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना जिव मुठीत धरुन आपले कर्तव्य बचावत राहावे लागते. पोलिसांना रात्रीच्या वेळी तडे गेलेल्या भिंतीच्या आत साप, विंचू येण्याच्या दहशतीत रात्र काढावी लागते. भिंती इतक्या जीर्ण झाल्या आहेत की उंदीर सुध्दा भिंतीवरुन गेल्यास खाली रेती व माती पडत आहे. त्याचबरोबर निवासस्थानांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने पोलिसांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. डोळ्यात तेल घालून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणार्‍या पोलिसांच्या घराचे रक्षण कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला असूून जुनाट जिर्ण झालेली निवासस्थाने पाडून सर्व पोलिस कर्मचार्‍यांसाठी नवीन पोलिस निवासस्थाने निर्माण करण्याची वेळ आली आहे. याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे.

** आतापर्यंत झाले केवळ वरवरचे काम

सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानांची देखभालच केली नसल्याची परिस्थिती आहे. या निवासस्थानांच्या दुरूस्तीच्या नावावर लक्षावधी रूपयांचा मलिदा लाटण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, येथे कवडीही खर्च करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. निवासस्थाने मोडकळीस आल्याने येथे वास्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना निवासस्थानाशेजारी झोपड्या उभारून, टिनशेड टाकून कसाबसा निवार्‍याचा आसरा घ्यावा लागतो.

** बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू

जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संवेदनशील गावात बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलिसांना चक्क तंबू ठोकून आपले कर्तव्य बजवावे लागते. तंबू ठोकण्यासाठी कुठलाही पर्यायच येथे उपलब्ध नाही. विश्रामगृहाला मालखाना करण्यात आल्याने पोलिसांना विश्रामासाठी कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जलंब : निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने पोलिसांनी पर्यायी निवारा उभारला आहे. शिकस्त झालेली इमारत.