शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीतील धाव ‘चिप’वर

By admin | Updated: February 20, 2016 03:29 IST

महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता. त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आ

डिप्पी वांकाणी,  मुंबई महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता. त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आले असून, यापुढे ५ किलोमीटरऐवजी १६०० मीटरचे तर महिलांना ८०० मीटरचे अंतर धावावे लागेल. शिवाय, उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाणार असून, या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल. पोलीस खात्यात भरती होण्यासाठी धावण्याची चाचणी घेतली जाते. यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाईल. या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल. मुंबईमध्ये १.६ किलोमीटरचा मोकळा भाग कुठे आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही संपूर्ण चाचणी पूर्ण व्हायला १० दिवस तरी लागतील.इच्छुक उमेदवाराला पूर्ण २० गुण मिळविण्यासाठी पुरुषांना हे अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांत व महिलांना २ मिनिटे ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करावे लागेल. त्याशिवाय गोळाफेक, लांबउडी, जोरबैठका व १०० मीटर वेगाने धावणे या प्रत्येकाला २० गुण आहेत. किमान १० जोरबैठका उमेदवाराला काढाव्या लागतात. परंतु पूर्ण २० गुण मिळविण्यासाठी १०० मीटरचे अंतर १२ सेकंदांत त्याला पार करावे लागते. या सगळ्या अटी महिलांनाही लागू आहेत अपवाद आहे तो जोरबैठकांच्या चाचणीचा, असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘आम्ही कंपन्यांकडून या चिपसाठी निविदा मागविल्या असून, सध्यातरी ही एक चिप महाग (५० रुपयांना) आहे. इच्छुक उमेदवार चाचण्या देण्यासाठी ३०० रुपये शुल्क भरतो. या ३०० रुपयांतील काही पैसे राज्य सरकारला मिळतात. आम्हाला सरकारकडून या परीक्षा/चाचण्या घेण्यासाठी १.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत व एवढ्या पैशांत या परीक्षांचे व्यवस्थापन होईल अशी आम्हाला आशा आहे. ही चिप कमी किमतीत मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’ रोज आम्ही नऊ हजारांपेक्षा जास्त इच्छुकांची धावण्याची परीक्षा घेत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.गेल्या वर्षी धावण्याच्या चाचणीत काही उमेदवारांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ही चाचणी तुम्ही अगदी सकाळी किंवा सायंकाळी घेणार का, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की आम्ही आधीच धावण्याचा वेळ कमी केला असल्यामुळे चाचणीचा वेळ (सकाळ किंवा सायंकाळ) हा काही अडथळा नाही. मुंबईत सध्या आम्ही १.६ किलोमीटरचा मोकळा पट्टा शोधत आहोत. चेंबूरमधील बीपीसीएल नजिकचा पट्टा निश्चित केला असला तरी अन्य पर्यायाच्याही शोधात आहोत, असेही त्याने सांगितले. गेल्यावर्षी पाच किलोमीटरचे अंतर पार करताना चार जणांचा मृत्यू झाला व त्यानंतर तीन वेळा हे अंतर कमी करण्यात आल्याचे वृत्त