शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

पोलीस शिपायाने नाकारले ६८ रुपयांचे मानधन

By admin | Updated: January 8, 2015 01:18 IST

पोलिसांच्या वेतन व मानधनातील भेदभावाचा मुद्दा तापला आहे. एका पोलीस शिपायाने साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून नाकारले आहे.

सुटीच्या मोबदल्यातील भेदभाव : थेट महासंचालकांनाच पत्रराजेश निस्ताने - यवतमाळ पोलिसांच्या वेतन व मानधनातील भेदभावाचा मुद्दा तापला आहे. एका पोलीस शिपायाने साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून नाकारले आहे. एवढेच नव्हे, तर हे मानधन सरकारी तिजोरीत जमा करून त्याची रितसर पावती देण्याची मागणीही पत्राव्दारे केली आहे. विश्वनाथ गोपाळराव नामपल्ले (ब.नं. ९५६) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात हा शिपाई कार्यरत आहे. १ जानेवारी २०१५ रोजी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या शिपायाने तुटपुंज भत्ते व मानधनाच्या समस्येला वाचा फोडली. साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलीस शिपायांना केवळ ६८ रुपये मानधन दिले जाते. कामगार कायद्याप्रमाणे आठ तास काम केल्यास एक दिवसाचे वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र पोलिसांना कामगारांचा हा वेतनाचा नियमही लागू केला जात नसल्याचे वास्तव आहे. कर्मचारी आपल्या हक्काच्या सुटीच्या दिवशी कामावर हजर झाला म्हणून नियमित वेतनासोबतच त्याला अतिरिक्त वेतन देणे अपेक्षित आहे. परंतू येथे अतिरिक्त तरसोडा साधे एक दिवसाचे नियमित वेतनही पोलिसांना दिले जात नाही. नेमक्या याच समस्येकडे या शिपायाने आपल्या पत्रातून महासंचालकांचे लक्ष वेधले. विश्वनाथ नामपल्ले या शिपायाने साप्ताहिक सुटीच्या दिवशी ड्युटी केल्यास मिळणारे ६८ रुपयांचे मानधन नाकारले आहे. हे मानधन मला नको, एक दिवसाचे वेतन दिले तरच ते आपल्याला मान्य राहील अन्यथा मी ते स्वीकारणार नाही, ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा करून त्याची रितसर पावती मला द्यावी, असेही या शिपायाने पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डझनावर समस्या आहेत. वेतन, भत्ते, निवासस्थान, ड्युटीचे तास, साप्ताहिक सुट्या, सोईसुविधा, वागणूक, राजकीय हस्तक्षेप, वरिष्ठांकडून होणारा छळ असे विविध प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत. त्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागत आहे. महसूल खात्याप्रमाणे पोलिसांनाही वेतनश्रेणी लागू करावी, यासाठी नागपूर ‘मॅट’मध्ये पोलिसांची आधीच कायदेशीर लढाई सुरू आहे. महसूल खात्यात आठ तास काम करणाऱ्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला ५ हजार ८०० रुपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला १० हजार ८०० रुपये मूळ वेतन आहे. पोलीस खात्यात १२ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ५ हजार ३०० रुपये तर २४ तास काम करणाऱ्या अधिकाऱ्याला १० हजार १०० रुपये मूळ वेतन आहे. महसूल खात्याला सर्व प्रकारचे सण-उत्सव व साप्ताहिक सुटी ठरलेली आहे. तर पोलीस खात्याला सण-उत्सवात कायम बंदोबस्तात रहावे लागते. आठवड्याची हक्काची सुटीही मिळण्याची शाश्वती नसते. आजारी रजेसाठीही वरिष्ठांच्या विनवण्या कराव्या लागतात. पोलीस खात्यात वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला एक दिवसाचे वेतन ६५० रुपये व वर्ग २ च्या अधिकाऱ्याला ११५० रुपये मिळते. मात्र साप्ताहिक सुटी अथवा सुट्या बंदच्या काळात काम केल्यास मोबदला म्हणून अनुक्रमे केवळ ६८ आणि ९० रुपये दिला जातो.