शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

पोलीस शिपायाने नाकारले ६८ रुपयांचे मानधन

By admin | Updated: January 8, 2015 01:38 IST

साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना १ जानेवारीला पत्र लिहून एका पोलीस शिपायाने नाकारले आहे.

राजेश निस्ताने - यवतमाळसाप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना १ जानेवारीला पत्र लिहून एका पोलीस शिपायाने नाकारले आहे. एवढेच नव्हे तर हे मानधन सरकारी तिजोरीत जमा करून त्याची रितसर पावती देण्याची मागणीही पत्राद्वारे केली आहे.विश्वनाथ गोपाळराव नामपल्ले (ब.नं. ९५६) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलीस शिपायांना केवळ ६८ रुपये मानधन दिले जाते. कामगार कायद्याप्रमाणे आठ तास काम केल्यास एक दिवसाचे वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र पोलिसांना त्याचा फायदा मिळत नाही. कर्मचारी सुटीच्या दिवशी कामावर हजर झाल्यास नियमित वेतनासोबतच त्याला अतिरिक्त वेतन देणे अपेक्षित आहे. परंतु अतिरिक्त सोडा, पोलिसांना नियमित एक दिवसाचे वेतनही दिले जात नसल्याकडे त्यांनी महासंचालकांचे लक्ष वेधले आहे. महसूल खात्याप्रमाणे पोलिसांनाही वेतनश्रेणी लागू करावी, यासाठी नागपूर ‘मॅट’मध्ये पोलिसांची कायदेशीर लढाई सुरू आहे.प्रथा मोडली च्पोलीस दल हे शिस्तीचे खाते आहे. थेट उच्चपदस्थांकडे परस्पर दाद मागण्याची प्रथा त्यांच्यात नाही. मात्र सहकाऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी नामपल्ले यांनी शिस्त व प्रथा बाजूला ठेवली.१महसूल खात्यात आठ तासांसाठी वर्ग- ३ च्या कर्मचाऱ्याला पाच हजार ८०० रुपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला दहा हजार ८०० रुपये मूळ वेतन आहे. २पोलीस खात्यात १२ तासांसाठी कर्मचाऱ्याला पाच हजार ३०० रुपये तर २४ तासांसाठी अधिकाऱ्याला दहा हजार १०० रुपये मूळ वेतन आहे.३पोलीस खात्यात वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला एका दिवसाचे वेतन ६५० रुपये व वर्ग २ च्या अधिकाऱ्याला १,१५० रुपये मिळते. मात्र साप्ताहिक सुटीच्या दिवसाचा कामाचा मोबदला अनुक्रमे केवळ ६८ आणि ९० रुपये दिला जातो.