जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट (बीएचआर) पतसंस्थेतील २६ लाखांच्या अपहारप्रकरणी अटक केलेल्या मुख्य आरोपी प्रमोद रायसोनी यांच्यासह इतर संशयितांचे मंगळवारी पहाटेपर्यंत जबाब नोंदविण्यात आले.अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांची तीन पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावा हस्तगत केला आहे. तपासाधिकारी अशोक सादरे यांच्या पथकाने प्रमोद रायसोनी व व्यवस्थापक सुकलाल माळी यांना मुख्य शाखेत आणले. तेथे पोलिसांनी गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी केली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी पतसंस्थेच्या शाखा, एकूण ठेवी, कर्जदारांची संख्या, पतसंस्थेची स्थावर व जंगम मालमत्ता तसेच संचालकांच्या बँक खात्यांचीही माहिती पोलिसांनी घेतली. अटक केलेल्या संचालकांच्या निवासस्थानांची तपासणीही मंगळवारी करण्यात आली.अटकेतील आरोपी इंद्रकुमार आत्माराम ललवाणी यांचा रक्तदाब वाढल्याने सोमवारी रात्री त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)राज्यातील अनेक शाखा बंद!च्ठेवी परत घेण्यासाठी खातेदारांची एकच गर्दी होत असल्याने पतसंस्थेच्या संचालकांनी राज्यातील अनेक शाखा बंद केल्या आहेत. जळगावमध्ये केवळ महाबळ व औद्योगिक वसाहतीमधील मुख्य शाखा सुरू आहे.
‘बीएचआर’च्या अध्यक्षांचा पोलिसांनी जबाब नोंदविला
By admin | Updated: February 4, 2015 02:19 IST