शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

खाकी वर्दीवर पुन्हा उचलला हात, पोलीस शिपाई सूर्यवंशींना मारहाण

By admin | Updated: September 15, 2016 00:43 IST

गिरगाव चौपाटी येथे कर्तव्य बजावत असताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : राज्यातील पोलिसांवर होणारे हल्ल्यांचे प्रकार सुरूच असून गिरगाव चौपाटी येथे कर्तव्य बजावत असताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. गिरगाव येथे गणपती विसर्जनावेळी आपले कर्तव्य बजावत असताना दोन तरुण दुचाकीस्वार चुकिच्या दिशेने यु टर्न घेत होते. त्यावेळी त्यांना विरोध केल्यामुळे तरुणांनी वाहतूक पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशीरा घड़ला. आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. 

साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अल्पेश पाटील यांना दुपारी मारहाण केली. याप्रकरणी सुफियान खानला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ रात्री साडे नउच्या सुमारास सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला. यातील एक आरोपी सूर्यवंशी यांच्या हाताला चावला. यामध्ये सूर्यवंशी जखमी झाले आहेत. अन्य पोलीस सहका-यांना माहीती मिळताच त्यांनी दोघाही तरुणांना ताब्यात घेतले.

दोघांना पोलीस ठाण्यात आणताच त्यांनीच पोलिसांवरच मारहाण झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. दोघेही राजकीय नेत्यांच्या मुलाचे मित्र असल्याचे समजते. राजकीय नेत्यांच्या मुलानेही पोलीस ठाण्यात अरेरावी सुरु केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसून गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान,  मंगळवारी सकाळी पोलिस गंगाराम निवते यांच्यावर देखिल दोन दुचाकीस्वाराने हल्ला केला त्यात निवते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. 

विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या मारहाणीनंतर पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूला १५ दिवसही उलटत नाहीत तोच राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

२३ ऑगस्ट रोजी विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन मुलाला विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले होते. सदर मुलाकडे लायसन्सही नव्हते. दरम्यान, त्या मुलाची चौकशी सुरु असताना त्या मुलाने आपल्या भावाला बोलावून घेतले. यावेळी त्याच्या भावाने मागून येऊन थेट विलास शिंदे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले. या घटनेनंतर विलास शिंदे यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.