शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दौंड येथे पोलिसाला अज्ञात युवकांकडून मारहाण

By admin | Updated: September 7, 2016 19:56 IST

दौंड येथे ड्युटवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदेश सूर्यवंशी यांना रात्रीच्या सुमारास मारहाण करण्याची घटना घडली.

ऑनलाइन लोकमत

दौंड, दि. 7 - राज्यात ठिकठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच दौंड येथे ड्युटवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदेश सूर्यवंशी यांना रात्रीच्या सुमारास मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांकडे कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर या घटनेचा शोध घेत आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुरकुंभच्या दिशेने एक ट्रक येत होता. हा ट्रक भगतसिंग चौकातून वळत असताना हा ट्रक पोलीस कॉन्स्टेबल संदेश सुर्यवंशी (वय ३२) यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकला चुकवत सुर्यवंशी बाजूला आले. नंतर ट्रकभरधाव वेगाने पाटसच्या दिशेने निघून गेला. या ट्रकचा पाठलाग सदरच्या पोलीसाने आणि नागरिकांनी केला आणि ट्रक पकडला. मात्र ट्रक चालक मद्यधुंद होता. ट्रक चालकावर कारवाई करण्याचा प्रयत्न सुर्यवंशी करीत असताना तेथे काही अज्ञात युवक आले. त्यांनी ट्रक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रकचालकाला युवकांच्या तावडीतून सोडविण्याचा सुर्यवंशी यांनी केला. तेव्हा या युवकांनी ट्रकचालक आणि पोलीस सुर्यवंशी यांना मारहाण केली. आणि ट्रकचालकाला पळूण जाण्यास मदत केली असल्याची माहिती पोलीस संदेश सुर्यवंशी यांनी सांगितले.वेळ आली तर पोलीस सेवेचा राजीनामा देईलयासंदर्भात पोलीस संदेश सुर्यवंशी म्हणाले मला मारहाण झाल्यानंतर मी ठाणे अंमलदार यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलो असता माझी तक्रार घेतली नाही याप्रकरणी मी अन्याय सहन करणार नाही. वेळ आली तर पोलीस सेवेचा राजीनामा देईल.