शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

सनातन आश्रमाला पोलीस संरक्षण

By admin | Updated: June 13, 2016 04:53 IST

श्रमिक मुक्ती दल संघटनेने रामनाथी-फोंडा येथील सनातनच्या आश्रमात घुसून दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा इशारा दिला

फोंडा (गोवा) : श्रमिक मुक्ती दल संघटनेने रामनाथी-फोंडा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात घुसून, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आश्रमाजवळ रविवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्यांसंदर्भात सनातन संस्था सध्या संशयाच्या घेऱ्यात आहे. सनातनच्या साधकांवर अटकेची कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाने दिलेल्या इशाऱ्यानंतर सनातन संस्थेतर्फे पोलिसांकडे संरक्षण मागणारे निवेदन दिले होते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांना गोव्यात प्रवेशबंदी लागू करण्याची मागणीही सनातनने केली आहे. (प्रतिनिधी)तिन्ही हत्या प्रकरणांचे सूत्रधार सनातनमध्येच असल्याचे आमचे मत ठामच आहे. पोलीस मूळ सूत्रधारापर्यंत लवकरच पोहोचतील, अशी अपेक्षा करू या. त्यामुळे तूर्त ५ सप्टेंबरपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित केले आहे.- कॉ. संपत देसाई, राज्य निमंत्रक, श्रमिक मुक्ती दल, महाराष्ट्र>मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्टकरावी - पृथ्वीराज चव्हाणइंदापूर : सनातन संस्थेवरील बंदीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत तत्कालीन आघाडी सरकारने केंद्र शासनाकडे केलेला अर्ज प्रलंबित आहे. बंदी घालण्याची आग्रही मागणी आपण त्या वेळी केली होती. सध्याच्या सरकारने बंदीबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले.सनातनवर तातडीनेबंदी घाला -सपामुंबई : सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांवर अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेवर तातडीने बंदी घालावी अन्यथा त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी दिला आहे.‘सनातन’च्या वकिलाच्याचौकशीची मागणीसांगली : गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपी सारंग अकोलकर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर हेही ‘अकोलकर हा माझ्या संपर्कात आहे’, असे जाहीरपणे सांगत असतील, तर याप्रकरणी अ‍ॅड. पुनाळेकर यांची चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी केली.वीरेंद्र तावडेचे सहा जणांशी कनेक्शनकोल्हापूर : मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रूद्रगौडा पाटील, ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड, प्रवीण लिमकर यांच्याशी डॉ. वीरेंद्र तावडे याचा फोनवरून अनेक वेळा संवाद झाला आहे. तावडेच्या मोबाइल कॉल डिटेल्सवरून ही माहिती पुढे आल्याचे ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पनवेल येथील आश्रमातही त्यांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्याचे समजते. सहा जणांचे रॅकेट असून, त्यांनी या तिन्ही हत्या कट रचून घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.