शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांनी जातीय सलोखा राखावा- जाधव

By admin | Updated: June 27, 2016 01:23 IST

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला दक्षता समितीने पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करावे,

नारायणगाव : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला दक्षता समितीने पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, तसेच नागरिक व पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील यांनी गावातील सामाजिक व जातीय सलोखा राखून गावातील घडामोडीवर लक्ष ठेवून नेहमी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी नारायणगाव येथे केले. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताबाई देवी यात्रेत बंदोबस्त, रात्रीच्या गस्तीवर कर्तव्य बजावल्याबद्दल पोलीसमित्रांना प्रमाणपत्र, १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती यांची बैठक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, डॉ. आनंद कुलकर्णी, मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे, मुख्याध्यपिका अनघा जोशी, उपसरपंच जंगल कोल्हे, संतोष पाटे, संतोष वाजगे, बाबू पाटे, रमेश पांचाळ, महिला दक्षता समितीच्या वैजंयती कोऱ्हाळे, अ‍ॅड. माधवा पोटे, जयश्री खैरे, मनीषा पारेकर, पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. जाधव म्हणाले, की पोलीस विभागाने महिला व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिसाद या मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करावा. पोलीस पाटलांनी गावात येणारा अनोळखी व संशयित व्यक्ती, परप्रांतीय यांची माहिती पोलिसांना कळवावी. गाव व परिसरातील घडणाऱ्या घटना वेळी बारकाईने लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, की जेणेकरून एखादी गंभीर घटना घडल्यास पोलिसांना तपास करताना मदत होईल. पोलीस पाटील पद हे महत्त्वाचे व जबाबदारीचे आहे. अनेक गावांतून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य होत नसल्याची खंत व्यक्त करून म्हणाले, की कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. पुस्तकी ज्ञानाने गुणवंत होण्याबरोबरच सामान्यज्ञान अवगत करून उच्च ध्येय बाळगा. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर होऊन त्यातून अनेक गंभीर घटना घडत आहेत. या प्रसंगी मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे यांनी मनोगत व्यक्त केले. नारायणगाव पोलिसांच्या कामाबाबत जाधव यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात आंबा, वड, पिंपळ, चाफा, गुलमोहर,कडुलिंब अशी विविध १०० झाडे जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. सू^त्रसंचालन प्रा. काशिनाथ आल्हाट यांनी केले. मुजावर यांनी आभार मानले.