शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

तर्रर्र अवस्थेत पोलीस अधिकाऱ्याचा गोंधळ

By admin | Updated: January 20, 2015 02:39 IST

शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कर्तव्यावर असताना पोलीस उपअधीक्षकाने अतिमद्यप्राशन करून कार्यालयातच गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी घडला़

अमरावतीतील घटना : बिनतारी संदेश कार्यालयात अधिकाऱ्यांशी अरेरावी, महिलांशीही असभ्य वर्तनअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाजवळील बिनतारी संदेश कार्यालयात कर्तव्यावर असताना पोलीस उपअधीक्षकाने अतिमद्यप्राशन करून कार्यालयातच गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी घडला़ नितीन जुवेकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून, पोलिसांनी जुवेकर यांना अटक केली आहे़ दरम्यान, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी या प्रकारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़ पोलीस विभागाचे विभागीय बिनतारी संदेश कार्यालय अमरावतीत आहे. पोलीस उपअधीक्षक जुवेकर हे सोमवारी सकाळी मद्यधुंद अवस्थेतच कार्यालयात दाखल झाले. अतिमद्यप्राशनामुळे त्यांचा सारखा तोल जात होता. खुर्चीवर नीट बसू शकत नसल्याने त्यांना अन्य अधिकाऱ्यांनी हटकले. मात्र, अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करीत महिला कर्मचाऱ्यांनाही त्यांनी असभ्य वागणूक दिल्याचे पोलीस निरीक्षक अनिल साखरे यांनी फे्रजरपुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे़ जुवेकर दारू पिऊन कार्यालयात आल्याची तक्रार यापूर्वीही १३ जानेवारी रोजीही फे्रजरपुरा ठाण्यात करण्यात आली होती. त्या वेळी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पण समज देऊन त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)हा तर नित्याचाच प्रकार!जुवेकर हे नेहमीच नशेत असतात. त्यांची पुणे पोलीस विभागाच्या मुख्यालयात ३ डिसेंबर २०१४ रोजी फॅक्सद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले़ पोलीस अधिकाऱ्याने मद्यप्राशन करून कर्तव्यावर हजर होणे योग्य नाही़ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जातील़ चौकशीनंतर नितीन जुवेकर या पोलीस उपअधीक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल़ - राम शिंदे, गृहराज्यमंत्री (शहर)