शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयातच घेतले विष

By admin | Updated: July 15, 2016 20:35 IST

पोलीस मुख्यालयात विषारी द्रव पिलेल्या एका ४३ वर्षीय पोलीस हवालदाराचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 15 - पोलीस मुख्यालयात विषारी द्रव पिलेल्या एका ४३ वर्षीय पोलीस हवालदाराचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सकाळी समोर आली असून, या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ हवालदाराच्या आत्महत्येने पोलीस दलात मात्र, एकच खळबळ उडाली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार चंद्रप्रकाश गंगाराम कलवले (वय-४३ ऱा़लातूर ) हे शुक्रवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील राखीव दलाच्या कार्यालयानजीक अस्वस्थ अवस्थेत पडल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोनि डी़एम़शेख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून चंद्रप्रकाश कलवले यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार सुरू केले़ मात्र, कलवले यांच्या शरिरात विष पसरल्याने उपचारादरम्यान काही तासातच त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे हे करीत आहेत़दरम्यान, हवालदार चंद्रप्रकाश कलवले यांना ८ जुलै रोजी पंढरपूर यात्रा बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. कलवले हे पंढरपूर येथे हजर न होता गैरहजर राहिले होते़ त्यानंतर ते गुरूवारी पोलीस मुख्यालयात आले असता, तेथील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना भेटून हजर व्हावे, असे सांगितल्याचे समजते़ कलवले यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या कली ? हे समजू शकले नाही़ तर मयताचा भाऊ विकास कलवले यांनी चंद्रप्रकाश कलवले हे रात्रीपासून मुख्यालयाच्या आवारात अस्वस्थ पडलले असतानाही कोणालाच कसे दिसले नाहीत ? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केली़ चौकशी सुरू आहेयाबाबत अपर पोलीस अधीक्षक डॉ़. दिपाली घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, हवालदार चंद्रप्रकाश कलवले यांना ८ जुलै रोजी पंढरपूर बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते़ मात्र, ते तेथे हजर न होता गैरहजर राहिले होते़ रात्री हजेरी झाल्यानंतर ११ वाजेपर्यंत कर्मचारी मुख्यालयाच्या आवारात असतात़ मात्र, कलवले हे मुख्यालयात आल्याचे कोणालाही दिसले नाहीत़ सकाळीच ते बेशुध्द अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या प्रकरणाची वरिष्ठस्तरावर चौकशी सुरू आहे़ तसेच आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ कलवले यांनी नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़