शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

नवी मुंबईत पोलिसांना मारहाण

By admin | Updated: March 8, 2017 05:48 IST

बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला गावातील लोकांनी जबर मारहाण केल्याने चार पोलीस व त्यांच्या अटकेतील पाच बांगलादेशी

नवी मुंबई : बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला गावातील लोकांनी जबर मारहाण केल्याने चार पोलीस व त्यांच्या अटकेतील पाच बांगलादेशी जखमी झाले आहेत. एनआरआय पोलीस ठाणे हद्दीतील कोंबडभुजे गावात मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही बांगलादेशी बेकायदा मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मानखुर्दमध्ये सापळा रचला होता. त्याठिकाणी काही बांगलादेशींना अटक केल्यानंतर त्यांचे इतर नातेवाईक नवी मुंबईत कोंबडभुजे गावात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली. यानुसार सात जणांचे पथक अटकेतील पाच बांगलादेशींना सोबत घेऊन पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कोंबडभुजे गावात गेले. या वेळी पोलिसांची चाहूल लागताच तिथल्या बांगलादेशीने व्यक्तीने स्वत:ला घरात कोंडून छताची कौले काढून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. ‘गावातून कोणालाच बाहेर घेऊन जाऊ देणार नाही’ असा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोयंडे यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत स्वत:चे व सहकाऱ्यांचे ओळखपत्र दाखवले. यानंतरही दीडशे ते दोनशे ग्रामस्थांच्या जमावाने पोलिसांना दोरीने बांधून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोयंडे, हवालदार मुरलीधर गवळी, नरेंद्र पाटील, महिला पोलीस नाईक मंगल उरणकर अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. तर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण करून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी १२५ पुरुष व ३० महिला अशा सुमारे दीडशे जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)