शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभर ४५ वर्षांवरील पोलिसांच्या ११ प्रकारच्या मेडिकल टेस्ट!]

By admin | Updated: July 6, 2017 04:58 IST

राज्यभरातील पोलीस खात्यातील ४५ वर्षांवरील अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, कामाची जबाबदारी

जमीर काझी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील पोलीस खात्यातील ४५ वर्षांवरील अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, कामाची जबाबदारी, ताणतणावामुळे त्यांना जडणाऱ्या विविध व्याधी व विकाराबाबतची पडताळणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. राज्यातील विविध पोलीस घटकांतील प्रमुखांनी संबंधित जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये येत्या तीन महिन्यांत विविध ११ वैद्यकीय चाचण्या करावयाच्या आहेत. जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात टप्प्याटप्प्याने ही मोहीम पूर्ण करावयाची आहे. यामध्ये जवळपास ६० हजार जणांची तपासणी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्य पोलीस दलातील आयपीएस (भा.पो.से.)अधिकाऱ्यांची दरवषी ‘आॅनड्युटी’ वैद्यकीय तपासणी करून घेण्याची सवलत आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर ऊन, पावसाचा विचार न करता, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या भोपोसे व्यतिरिक्त त्या खालचे अधिकारी व अंमलदारांना मात्र अशी सुविधा नाही. त्यामुळे आरोग्याबाबतच्या जागृतीसह विकारांबाबत वेळीच सावधगिरी बाळगून, प्रतिबंधक औषधोपचारासाठी ४५ वर्षांवरील पोलिसांच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार, हवालदारापासून सहायक फौजदार व उपनिरीक्षकापासून ते उपायुक्त/अधीक्षक (मपोसे) दर्जाच्या अधिकाऱ्यांची तपासणी होणार आहे. पोलीस घटकप्रमुखांनी अधिकारी व अंमलदाराच्या तपासणीचे नियोजन करण्यासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावयाची आहे. त्यांनी त्याबाबत सरकारी रुग्णालयाच्या प्रमुखांशी संपर्क साधून, ३० सप्टेंबरपर्यंत तपासणीचे वेळापत्रक बनवायचे आहे. तपासणी झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदाराच्या तपासणीचा अहवाल, विहित नमुन्यामध्ये पोलीस मुख्यालयाकडे पाठवायचा आहे. तीन कोटी खर्चाला मान्यता एका पोलिसांच्या तपासणीसाठी ५०० रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. सव्वा दोन लाख मनुष्यबळ असलेल्या पोलीस दलामध्ये जवळपास ६० हजार जण ४५ वर्षांवरील आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी सरासरी एकूण ३ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. या चाचण्या होणार रक्त तपासणी (सीबीसी), मधुमेह, लिपीड प्रोफाइल टेस्ट, यकृत चाचणी, नेत्र, रक्तदाब, ईसीजी, ब्रॉयन्कायटिस रुग्णांसाठी छातीचा एक्स-रे आणि उंची व वजनाच्या प्रमाणात बॉडी मास इन्डेक्स या ११ प्रकारच्या चाचण्या सरकारी रुग्णालयात केल्या जाणार आहेत.