शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोहमार्ग पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड

By admin | Updated: December 29, 2016 20:12 IST

लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातून रेल्वेने आणण्यात येत असलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 29 - लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातून रेल्वेने आणण्यात येत असलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे या रकमेमध्ये दोन हजाराच्या नव्या नोटा आहेत. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून दोघाजणांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली. मनिष उमाशंकर द्विवेदी (वय ३६, रा. शिवनगर कॉलनी, भुलणपुर, जि. वाराणसी, उत्तरप्रदेश), प्रमोदकुमार मेवालाल जैसवाल (वय २४, रा. नुरी, जि. चंदोली, उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष आणि प्रमोदकुमार गुरुवारी दुपारी ज्ञानगंगा एक्स्प्रेसने पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. फलाट क्रमांक दोनवर पोलिसांकडून नेहमीप्रमाणे सुरक्षेबाबत बॅग तपासणी सुरु होती. या दोघांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचे बंडल दिसून आले. त्यांच्याक डे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे अधिक चौकशी केली असता ही रक्कम वाराणसी येथील गंगा पेपर्स लिमिटेड या कंपनीची असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पुण्यातील एका अधिका-याला देण्यासाठी ही रक्कम आणल्याची माहितीही या दोघांनी दिली आहे. त्यांच्याकडे रकमेची खातरजमा करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला माहिती कळवली असून रक्कम आणि या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना लोहमार्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, अतिरिक्त अधिक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तुकाराम वहीले, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिम्मत माने पाटील, कर्मचारी बी. डी. ओंबासे, पोलीस नाईल लाखे यांनी केली आहे.