शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पुरावे शोधण्यासाठी पोलिसांचा आटापिटा!

By admin | Updated: August 31, 2015 02:09 IST

शीना बोराच्या मृतदेह अवशेषांचा डीएनए चाचणी अहवाल नकारार्थी आला तर मात्र पोलिसांसमोरील अडचणी वाढू शकतात आणि आरोपींना बचावाची संधी मिळू शकते.

मुंबई : शीना बोराच्या मृतदेह अवशेषांचा डीएनए चाचणी अहवाल नकारार्थी आला तर मात्र पोलिसांसमोरील अडचणी वाढू शकतात आणि आरोपींना बचावाची संधी मिळू शकते. हे ओळखून पोलिसांनी आरोपींविरोधातील अधिकाधिक परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुरावे शोधण्यासाठी रविवारी पोलिसांनी तीन्ही आरोपींना पेणर्यंत नेले. एप्रिल २०१२मध्ये मुंबई ते पेण प्रवासात आरोपींनी कुठे पेट्रोल भरले, नाश्त्यासाठी कुठे थांबले त्या सर्व ठिकाणी आरोपींना नेले. तेथे साक्षीदार मिळतात का ते पाहिले. अवशेषांचीही चाचणी करण्यात जेजे रूग्णालयाने असमर्थता दर्शविली तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होऊ शकते, असा दावा पोलीस करत आहेत. मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने चौकशीत सहकार्य केले नसले तरी तिचा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय यांनी शीनाची हत्या झाली, या हत्येत कोणी कसा सहभाग घेतला याची कबुली दिली आहे. हत्येत कमी सहभाग आढळल्यास रायला माफीचा साक्षीदार करण्याबाबत पोलिसांचे संकेत.इंद्राणीच्या सांगण्यावरून शीनाच्या नावे मुंबई मेट्रो वन कंपनीला राजीनाम्याचा ईमेल धाडणाऱ्याची ओळख पटली असून त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नसली तरी तोही माफीचा साक्षीदार होऊ शकतो.राहुललाही होती भीती : शीना अचानक गायब झाल्यानंतर राहुलही घाबरला होता. त्याने याबाबत आई शबनम यांच्याशी चर्चाही केली होती. शबनम यांनीच त्याला मुंबई सोडून देहरादूर येथे स्थायिक होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तो देहरादून येथे शबनम यांच्यासोबत राहू लागला. तेथून तो शीनाचा शोध घेण्यास किंवा तीच्या गायब होण्यातले रहस्य उलगडण्यास अधूनमधून मुंबईत येत होता.पीटर मुखर्जी यांचा पूत्र व शीनाचा प्रियकर राहुल याने जबाबात २४ एप्रिलला शीना इंद्राणीला भेटल्याचे सांगितले आहे.शीनाचा सख्खा भाऊ मिखेलने पोलिसांना शीना हत्येशी संंबंधीत अनेक महत्वाचे पुरावे दिले आहेत.देहरादून येथे शीनाचा पासपोर्ट सापडल्याने शीना अमेरिकेत आहे, ही इंद्राणीने मारलेली थाप उघड होते.सुटकेस सापडलीइंद्राणी व पीटर मुखर्जी यांच्या वरळी येथील निवासस्थानी गॅरेजमधून खार पोलिसांनी एक सुटकेस हस्तगत केली आहे. ही सुटकेस मिखेल बोरा याच्या हत्येसाठी वापरण्यात येणार होती, असा संशय पोलिसांना आहे. मिखेल हा शीनाचा सख्खा भाऊ आणि इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे.इंद्राणीविरोधात स्वतंत्र गुन्हा?मुंबई पोलीस इंद्राणी मुखर्जीविरोधात मिखेल बोराच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मिखेल हा शीना बोराचा सख्खा भाऊ असून शीना हत्याकांडात पोलिसांसाठी महत्वाचा साक्षीदार आहे. शीनाच्या हत्येच्या हेतूबाबत मिखेलने नेमकी माहिती पोलिसांना पुरवल्याचे समजते. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात इंद्राणीने आपल्याही हत्येचा दोनदा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलीस शीना बोरा हत्याकांडात इंद्राणीविरोधात हत्येचा प्रयत्न हे कलम जोडू शकतात किंवा स्वतंत्र गुन्हाही नोंदवू शकतात, असे समजते.सिद्धार्थ दास यांचा शोध सुरूशीना बोराचे वडील सिद्धार्थ दास यांचा मुंबई पोलिसांकडून कसोशिने शोध सुरू आहे. ते जिवंत आहेत याबाबत पोलीस आश्वस्त असले तरी आठवडयाभरापासून शीना हत्याकांड देशभर गाजूनही ते पुढे आलेले नाहीत किंवा त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांचा जबाब पोलिसांसाठी महत्वाचा आहेच मात्र पेण, गागोदे खिंडीतून नव्याने सापडलेले मृतदेहाचे अवशेष शीनाचेच आहेत का हे स्पष्ट करणाऱ्या डीएनए चाचणीसाठी सिद्धार्थ यांची निकड पोलिसांना अधिक अस्वस्थ करते आहे.