शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी सोडला समाधानाचा सुस्कारा

By admin | Updated: July 19, 2015 02:14 IST

रमजान महिन्यात अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून येणाऱ्या सतर्कतेच्या सूचना आणि पुण्यातील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर महानगरात

मुंबई : रमजान महिन्यात अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून येणाऱ्या सतर्कतेच्या सूचना आणि पुण्यातील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर महानगरात या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पहिल्या रोजापासून ते ईदच्या नमाज पठणापर्यंत शहर व उपनगरात एकही अनुचित घटना न घडल्याने पोलीस यंत्रणेने समाधानाचा सुस्कारा सोडला. साप्ताहिक सुट्या, रजा अधिकृतपणे बंद नसल्या तरी बंदोबस्ताच्या नावाखाली वरिष्ठांकडून त्या मंजूर केल्या जात नव्हत्या. त्यामुळे कर्तव्यावर हजर असलेल्या या कर्मचाऱ्यांना आतातरी हक्काची सुट्टी, रजा मिळावी अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.रमजानच्या कालावधीमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बंदोबस्ताचे विशिष्ट पद्धतीने नियोजन केले होते. मुस्लीमबहुल वस्त्यांसोबत मशीद, मदरशांभोवती साध्या व गणवेषातील पोलीस दिवसरात्र गस्त घालत होते. महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी ड्रोन, खेळण्यातील विमाने उडविण्यास व वाद्यवृंदाची उपकरणे वापरण्यावर बंदी घालण्यात आली. दरम्यान, पंधरवड्यापूर्वी पुण्यात पर्वती येथे दोन समाजांत दगडफेक होऊन नुकसान झाले होते, त्यामुळे बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. या परिसरात संशयास्पदरीत्या अढळणाऱ्या व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने शहानिशा केली जात होती. या कामासाठी संबंधित मशिदीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना मदत केली. ईद शांततेत पार पडल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)