शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ब्रीच कॅण्डी येथील अनधिकृत बांधकामाची पोलिसांकडून दखल

By admin | Updated: April 30, 2016 02:20 IST

अनधिकृत बांधकाम आढळल्यास एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे पत्र डी वॉर्डच्या साहाय्यक महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

मुंबई : भुलाभाई देसाई रोडवर ब्रीच कॅण्डी येथील सीटीएस क्रमांक ७६४ या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामाची दखल घेत मुंबई पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथे अनधिकृत बांधकाम आढळल्यास एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे पत्र डी वॉर्डच्या साहाय्यक महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन दलालाही या उल्लंघनाबाबत पाहणी करण्याचे कळवण्यात आले आहे.मलबार हिल विभागातील या बांधकामात तब्बल ३१ हजार ११९ चौ. फुटांचा एफएसआय घोटाळा झाला असून त्यात महापालिका अधिकारी सामील असल्याची तक्रार करणारे निवेदन जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मानव जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. हा घोटाळा २00 कोटींचा असून त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेचा महसूल बुडाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घोटाळ्यात इमारत प्रस्ताव विभागाचे अधिकारी सामील असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी जोशी यांनी केली आहे. प्रत्येक मजल्यावर २,८२९ चौ. फूट याप्रमाणे अकरा मजल्यांवर एकूण ३१ हजार ११९ चौ. फुटांचा हा घोटाळा असून या आराखड्यात झालेले बदल आणि अनियमितता याचीही माहिती निवेदनात देण्यात आली आहे. महापालिकेकडून स्थानिक पोलिसांना अनधिकृत बांधकामांची माहिती देऊन कारवाई करण्याची सूचना केली जाते. मात्र या प्रकरणात पोलिसांनीच महापालिका अधिकाऱ्यांना पाहणी करण्याबाबत पत्र पाठवले आहे. आता यापुढे पालिका काय पावले उचलते हे पाहणे गरजेचे ठरेल. (प्रतिनिधी)