शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक रायतेंची चौकशी

By admin | Updated: October 22, 2015 01:28 IST

जळगाव येथील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित तथा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची नाशिक

नाशिक : जळगाव येथील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित तथा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजित सिंह यांनी बुधवारी दिवसभर चौकशी केली़चौकशीत सादरे यांनी केलेल्या आरोपांचा रायते यांनी इन्कार केला असून, तसा लेखी जबाबही महानिरीक्षकांकडे सोपविला आहे़ विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, प्रभाकर रायते यांची खातेअंतर्गत विभागीय चौकशी होणार आहे़ त्यानुसार बुधवारी रायते यांची चौकशी झाली. त्यांनी दिलेल्या लेखी जबाबात सादरे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत केलेले सर्व आरोप फेटाळून, रामानंदनगर पोलीस ठाण्यातील बदली सदरे यांच्या कामकाजाच्या सोईने झाली होती. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे लेखी जबाबात म्हटले आहे़जळगावमधील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले ‘दिवाळी सोने’ या बातम्या, तसेच टीव्ही चॅनलवर दाखविल्या गेलेल्या आॅडिओ क्लिपबाबतची चौकशी करण्यात आली नसल्याचे सादरे यांनी चिठ्ठीत लिहिलेले आहे़ या बातम्यांची व आॅडिओ क्लिपची जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांनी (गृह) चौकशी करून अहवाल दिल्याचेही रायते यांनी जबाबात म्हटले आहे़ तपास पथक जळगावलापंचवटी पोलीस ठाण्यात सादरे आत्महत्याप्रकरणी संशयित सुपेकर, रायते व चौधरी यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे़ महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासासाठी नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक जळगावला गेले होते़ त्याने जळगावला दिवसभर चौकशी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली.संशयितांना अटक केव्हा?सादरे आत्महत्या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला असून, पोलिसांचा चौकशीचा फार्स सुरू आहे़ सर्वसामान्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाते. मात्र, यामध्ये संशयित बडे पोलीस अधिकारी असल्याने त्यांना पोलीस सखोल चौकशीच्या नावाखाली जाणीवपूर्वक वेळ देत असल्याचा आरोप केला जात आहे़ संशयितांना ताब्यात घेऊन नंतर चौकशी करावी, अशी तक्रारदारांची मागणी आहे़