शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्याकांड तपासातील पोलीस निरीक्षकाची बदली रद्द!

By admin | Updated: June 1, 2016 04:28 IST

कॉ. गोविंदराव पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूर येथे झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली आहे.

मुंबई : कॉ. गोविंदराव पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूर येथे झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कन्या कॉ. स्मिता पानसरे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार, ही बदली तत्काळ रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य करत तसे आदेश निर्गमित केले. या शिष्टमंडळात भाकपचे राज्य सचिव कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई कार्यकारिणी सदस्य कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. अशोक सूर्यवंशी, अ‍ॅड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. हेमंत बुट्टे आदींचा समावेश होता. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशील व महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, सुरुवातीपासून या तपासात असणारे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांची बदली झाल्याने, तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब ध्यानात घेऊन दिवंगत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. सरकारने नेमलेल्या एसआयटीवर पूर्णवेळ व स्वतंत्र आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून नियुक्त करावा आणि त्यांच्या हाताखाली सक्षम पोलीस अधिकाऱ्यांचे पथक निर्माण करावे. त्याप्रमाणे, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत या पथकातील अधिकाऱ्यांची बदली करू नये, असेही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली.