शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन नोंदीबाबत पोलीस उदासीन

By admin | Updated: January 10, 2016 00:49 IST

गुन्हा घडल्यानंतर त्याची नोंद ‘आॅनलाईन’ स्टेशन डायरीत करण्याची प्रणाली पोलीस ठाण्यांमध्ये उभारण्यात आली आहे. मात्र अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे

- एकनाथ पाटील,  कोल्हापूरगुन्हा घडल्यानंतर त्याची नोंद ‘आॅनलाईन’ स्टेशन डायरीत करण्याची प्रणाली पोलीस ठाण्यांमध्ये उभारण्यात आली आहे. मात्र अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अवघड झाल्याने स्टेशन डायरीची पारंपरिक पद्धतच संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सुरू आहे.केंद्रीय गृहखात्याने २०१४ मध्ये गुन्ह्यांची माहिती संकलित करणे, वेळेत वरिष्ठांना पाठविणे, वेळेत निर्गती करणे आदी मुद्यांचा विचार करून ‘क्राईम क्रिमीनल ट्रॅकिंग अ‍ॅन्ड नेटवर्किंग सिस्टीम’ ही कार्यप्रणाली बनविली आहे. या माध्यमातून संपूर्ण देशभरातील पोलीस ठाणी एकमेकांशी आॅनलाईनद्वारे जोडली गेली आहेत. आजही राज्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात आॅनलाईन डायरी हाताळण्याचे काम अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना येत नसल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यात किंवा पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकाऱ्यांच्या टेबलवर असलेल्या संगणक फक्त ‘शो-पीस’च बनले आहेत. नवीनच भरती झालेल्या पोलिसांकडून ते माहिती करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. डायरी मराठीत नोंदवायची असल्याने या नव्या पोलिसांना टायपिंग येत नसल्याने तीसुद्धी मोठी डोकेदुखी ठरत आहे. राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याचे काम आॅनलाईन करण्यात आले आहे. परंतु कोल्हापुरात आॅनलाईन डायरीला स्टेशन डायरीची जोड देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील जुन्या कर्मचाऱ्यांना ही आॅनलाईन डायरी नीट हाताळता येत नसल्याने ते आजही स्टेशन डायरीचा आधार घेतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज १ जुलै २०१५ पासून आॅनलाईन सुरू आहे. काही कर्मचारी पूर्ण प्रशिक्षित नसल्याने ते आजही स्टेशन डायरीचा वापर करीत आहेत. स्टेशन डायरीच्या सवयीतून काही कर्मचारी अद्याप बाहेर पडलेले दिसत नाहीत. लवकरच सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी पूर्णत: प्रशिक्षित होतील. - भारतकुमार राणे, शहर पोलीस उपअधीक्षक