शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मदत केंद्र नावापुरतेच!

By admin | Updated: May 17, 2016 02:44 IST

पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.

कामशेत : कान्हे गावात व आजूबाजूच्या परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांच्या संगनमताने परिसरात राजरोसपणे अनेक अवैध धंदे सुरू असल्याचे आणि गावातील पोलीस मदत केंद्र नावापुरतेच उरल्याचा आरोप होत आहे.कान्हे व परिसराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला असून, तेवढ्याच प्रमाणात अवैध धंदे फोफावल्याचे दिसत आहे. गावात भरवस्तीत चार ते पाच ठिकाणी विनापरवाना,अवैध दारूविक्री सुरू असून, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गांजाविक्री, जुगार चालवणाऱ्यांचे अड्डे, मटका बिनधास्तपणे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. स्थानिक नागरिक विशेषत: महिला व विद्यार्थी यांना त्याचा त्रास होत आहे.बंदी असलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला आदींची खुलेआम विक्री होत आहे. पोलीस आणि अन्न व प्रशासन विभागांच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेमुळे गुटखाबंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसत आहे. कान्हे व परिसरात एका वर्षात पाच ते सहा खून, मारामाऱ्या व इतर अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांची सुरक्षितता तसेच कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक वर्षांपूर्वी गावात पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. पण, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यापेक्षा अवैध धंद्यांना अभय देऊन स्वत:चे खिसे भरण्याचे काम संबंधितांकडून सुरू असल्याचा आरोप होत आहे. मदत केंद्रात आलेल्या तक्रारदारांना वाईट वागणूक दिली जात असून, तक्रारीची नोंद केली जात नाही. नोंदवही नसल्याचे कारण सांगून तक्रारदाराला परस्पर वडगाव पोलीस ठाण्यात पिटाळले जाते. हे मदत केंद्र नावापुरतेच उरले आहे, असे नागरिक सांगतात.महामार्गावर अनेक हॉटेल व ढाबे आहेत, जे रात्री दोन दोन वाजेपर्यंत चालू असतात. येथे बिनबोभाट दारू व नशेच्या पदार्थांची विक्री होते. ‘ड्राय डे’लाही येथे हमखास दारू उपलब्ध होते. अनेक ढाब्यांवर अवैध व्यवसाय चालत असून, पेट्रोल टॅँकरमधून पेट्रोल चोरी, डांबर, आॅइल, तेल आदींचा धंदा तेजीत असल्याचे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अवैध धंद्यांविषयी कोणी काही बोललेच, तर त्याला विविध मार्गांनी गप्प केले जाते. पोलीस मदत केंद्र नागरिकांसाठी कधी सक्षमपणे कार्यरत होणार? अवैध धंद्यांना आळा कधी बसणार? अशी नागरिकांकडून विचारणा होत आहे. (वार्ताहर)