शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: July 2, 2016 02:57 IST

गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते.

कळंबोली : कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त यामुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजवावे लागते. या कारणाने त्यांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टर डेचे औचित्य साधत कामोठे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कामोठे पोलिसांची आरोग्य तपासणी शुक्र वारी करण्यात आली. या शिबिराचे लोकमत माध्यम प्रायोजक होते.परिमंडळ-२ आणि पनवेल विभागातील कामोठे हे अतिशय महत्त्वाचे पोलीस ठाणे मानले जाते. पनवेल-सायन महामार्ग, जवाहर इंडस्ट्री, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वेस्थानक त्याचबरोबर कामोठे वसाहत आणि बाजूच्या गावांचा या पोलीस ठाण्यात समावेश होतो. कामोठे ही भरगच्च अशी वसाहत असल्याने वाढत्या लोकवस्तीबरोबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता कामोठे पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेकदा पंधरा ते सोळा तास काम करावे लागते. जागरण, अवेळी जेवण यामुळे व्याधी जडतात. पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने कामोठे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी पोलीस ठाण्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अरूण भगत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संतोष जायभाय, डॉ. अमोल देशमुख, डॉ. हेमंत पाटील, डॉ. गणेश साळे, डॉ. विजय पाटील, डॉ.गणेश हंडे, डॉ. क्षीरसागर यांच्यासह ५३ डॉक्टर्स कामोठा पोलीस ठाण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक, पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, ई.सी.जी, लिपिड प्रोफाईल यासारख्या विविध चाचण्या करण्यात आल्या. यावेळी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर उपस्थित होते. (वार्ताहर)चाळीसनंतर प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची सगळया चाचण्या करणे गरजेचे आहे. याचे कारण म्हणजे व्याधी या चाळीस वर्षानंतर उदभवत असल्याचे डाँ अरूण भगत म्हणाले. पोलीस आण िडाँक्टर हे समाजाची सेवा करत असतात डाँक्टर डेच्या निमित्ताने या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दोघांमधील जवळीकता वाढली असल्याचे डाँ भगत यांनी सांगितले. शिबिर यशश्वी करण्याकरीता पोलीस कर्मचारी चेतन अिहरे, अमति धावडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी वनमहोत्सवानिमित्त पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.>चाळिशीनंतर तपासणी!चाळिशीनंतर प्रत्येकाने आरोग्याच्या सगळ्या चाचण्या करणे गरजेचे असल्याचे डॉ. अरूण भगत म्हणाले. डॉक्टर डेच्या निमित्ताने डॉक्टर आणि पोलिसांमधील जवळीक वाढली आहे. शिबिर यशस्वी करण्याकरिता पोलीस कर्मचारी चेतन अहिरे, अमित धावडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी वनमहोत्सवानिमित्त पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.