शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरोडय़ात आढळला पोलीसपुत्र

By admin | Updated: November 11, 2014 01:14 IST

कामोठे येथील ज्वेलर्सवर दरोडय़ाप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले आहे.

नवी मुंबई : कामोठे येथील ज्वेलर्सवर दरोडय़ाप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले आहे. त्यापैकी एक जण पोलिसाचा मुलगा आहे.
कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर दरोडा पडल्याची घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील 7क् तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. परंतु तिघांनीही तोंडाला रुमाल बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटलेली नव्हती. अखेर एक महिन्याच्या कसून तपासाअंती गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. सोमनाथ पांडुरंग दिसले (23), अजरुन रामकुमार टाक (27) आणि किशन गोरख करडे (2क्) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी अजरुन टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ट्रॉम्बे, चेंबूरपोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर किशन करडे हा पोलीस पुत्र असून त्याचे वडील मुंबई पोलीसमध्ये आहेत. किशन व सोमनाथ हे प्रथमच या गुन्हय़ात सहभागी झाले होते. हे तिघेही चेंबूरचे राहणारे आहेत. 
नूतन ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी त्यांनी 15 दिवस तेथे पाळत ठेवली होती.  त्यानुसार दरोडा टाकण्याच्या दिवशी त्यांनी नेरूळ येथील त्यांच्याच मैत्रिणीच्या भावाची मोटारसायकल बनावट चावीने पळवली होती. याच मोटारसायकलवर येऊन त्यांनी ज्वेलर्समध्ये लूट केली अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. सदर घटनेनंतर पोलिसांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. परंतु त्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता. अखेर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे गेल्या एक महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्याद्वारे ज्वेलर्सच्या आवारात वावर झालेल्या सुमारे एक हजार व्यक्तींची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यामधून या तिघांचा शोध घेऊन अत्यंत शिताफीने त्यांना अटक केली. त्यासाठी गुन्हे शाखा परिमंडळ 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, उपनिरीक्षक किरण भोसले, दादा अवघडे, सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप देसाई यांचे पथक महिनाभर कार्यरत होते.तिघांकडून पोलिसांनी 191.43 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)