शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील ‘ते’ पोलीस लवकरच बडतर्फ

By admin | Updated: April 21, 2017 03:09 IST

सांगली पोलिसांनी ९ कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने पोलिसांच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

जमीर काझी, मुंबईसांगली पोलिसांनी ९ कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने पोलिसांच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस ठाणे, शाखेचे प्रभारी निरीक्षक व त्याचे सहकारी व पोलीस ठाण्यातील कारभारावर बारीक लक्ष ठेवा, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत. सांगलीतील भ्रष्टाचारप्रकरणी अटक केलेल्या ७ पोलिसांची विभागीय चौकशी तातडीने सुरू करण्याची सूचना कोल्हापूर परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना गुरुवारी दिली. त्यामुळे सध्या निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांवर लवकरच खात्यातून बडतर्फीचा बडगा उगारला जाणार आहे. निरीक्षक विश्वनाथ धनवट, साहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, साहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील व कुलदीप कांबळे अशी या पोलिसांची नावे आहेत. याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने सुरू केला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघडकीस येणारे राज्य पोलीस दलातील हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे महासंचालकांनी अशा घटनांबाबत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त, अधीक्षकांना केल्या आहेत. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी घटकप्रमुखांना याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, साहाय्यक आयुक्तांनी कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यातील कामाची नियमित व सखोलपणे तपासणी करावी, पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्हे, तक्रार अर्जाचा तपास, प्रलंबित प्रकरणाबाबत संबंधितअधिकाऱ्यांकडून अहवाल घेण्याची सूचना केली आहे. उपायुक्त, पोलीसप्रमुखांनी त्याबाबत साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांना मार्गदर्शन करण्याचेही म्हटले आहे. सांगली प्रकरणातील पोलिसांची चौकशी तातडीने सुरू करून योग्य कारवाईचे आदेश त्यांनी कोल्हापूरचे आयजी नांगरे-पाटील यांना दिले आहेत. अशी हडप केली कोट्यवधींची माया१ कोल्हापूर येथील वारणानगर शिक्षक कॉलनीत छापा टाकून सांगली गुन्हा अन्वेषण पथकातील निरीक्षकांसह सात जणांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये हडप केले. मिरजेतील मैनुद्दीन मुल्ला याच्या घरी ३ कोटींची रक्कम मिळाल्यानंतर तपासाच्या नावाखाली त्यांनी ही रक्कम हडप करून स्वत:च्या व नातेवाइकाच्या नावे बॅँकेत जमा केली होती. २याबाबत स्थानिक उद्योजक झुंजार सरनोबत यांनी तक्रार दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत निरीक्षक विश्वनाथ धनवटसह सर्व जण दोषी आढळले. सर्वांवर अपहार, कर्तव्याचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून सर्वांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) देण्यात आलेला आहे.