शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रेलरने पोलिसाला चिरडले !

By admin | Updated: June 29, 2016 02:11 IST

बाळापूरनजीक घटना; ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर हायवे पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेल्या हायवे ट्रॅप पोलीस कर्मचार्‍यास भरधाव ट्रेलरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस कर्मचारी नितीन निखार जागेवरच ठार झाले. या प्रकरणी ट्रेलर चालकास बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळापूर शहराबाहेर असलेल्या हायवे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी नितीन निखारे मंगळवारी सकाळी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असताना खामगावकडून येत असलेल्या आरजे २७ जीए ४८८४ क्रमांकाच्या ट्रेलरला त्यांनी तपासण्यासाठी थांबण्याचा इशारा केला; मात्र ट्रेलर भरधाव असल्याने चालकाने सदर ट्रेलर राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असलेले निखार यांच्या अंगावर नेला. यामध्ये निखार ट्रेलरखाली चिरडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला; मात्र निखार यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी ट्रेलरचालकाचा पाठलाग करून त्याला अटक केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रेलर बाळापूर पोलिसांनी जप्त केला असून ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.