शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातून पाणी घेतलं म्हणून पोलिसांची शेतक-यांना मारहाण

By admin | Updated: March 25, 2017 18:35 IST

अहमदनगर येथील पाथरवाला नेवासामध्ये शेतक-यांनी मुळा कालव्याचे पाणी शेतात घेतले म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर (भेंडा), दि. 25 -  मुंबईतील मंत्रालय परिसरात पोलिसांकडून शेतकऱ्याला करण्यात आलेले मारहाण प्रकरण चर्चेत असतानाच. पाथरवाला नेवासा येथील शेतकऱ्यांनी मुळा कालव्याचे पाणी शेतात घेतले. म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. 
 
शेतीसाठी मुळा पाटबंधारेचे आर्वतन सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. पाथरवाला येथील स्वामी समर्थ पाणी वापर संस्थेने, शंभर एकर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी नोंदवली होती. संस्थेकडे थकबाकी नसल्याची माहिती दत्तात्रय खाटीक यांनी दिली. पाणी वापर संस्थेच्या पाच सभासदांचे भरणे राहिले होते. त्यासाठी हे भरणे होईपर्यंत पाणी चालू ठेवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी  शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी शेतीसाठी घेतले. म्हणून पोलिसांनी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष हरीभाऊ खाटीक, शेतकरी संतोष खाटीक यांना बेदम मारहाण केली. 
मुळा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या, पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी पाथरवाला ग्रामस्थ, पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुकाणा पोलीस चौकीसमोर आंदोलन केले. नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारुन असून संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यानंतर शेतक-यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला.