शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

युरोपातून आलेल्या १०० फॅक्सने पोलीस संभ्रमात

By admin | Updated: July 7, 2014 04:11 IST

अ‍ॅग्नेलो वाल्डारीस या संशयिताचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना युरोपभरातून आलेल्या शंभरावर फॅक्समुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत

डिप्पी वांकाणी, मुंबईअ‍ॅग्नेलो वाल्डारीस या संशयिताचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना युरोपभरातून आलेल्या शंभरावर फॅक्समुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत. काही स्वयंसेवी संस्था जाणूनबुजून भारताविषयीचे मत कलुषित करण्यासाठी या सर्व प्रकरणात बनाव रचत असल्याचा संशय पोलिसांना आहे.वाल्डारीसला अन्य दोघा जणांसह मुंबईतील वडाळा जनरल रेल्वे पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात नेले जात असताना त्याने कथितरीत्या रेल्वे रुळांवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याचा लोकल रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. मात्र त्याच्या बरोबरच्या आरोपींनी दावा केला की त्यांचा तुरुंगात पोलीस शारीरिक आणि लैंगिक छळ करत असत आणि त्याला गाडीखाली फेकून दिले गेले. वाल्डारीसच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने प्रथम हे प्रकरण गुन्हे शाखेकडे, नंतर सीआयडीकडे आणि बुधवारी सीबीआयकडे वर्ग केले. या प्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे शंभराहून अधिक फॅक्स राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नंबरवर युरोपभरातून आले आहेत. हे फॅक्स फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि इंग्लिश भाषेत असून, जमर्नीतील म्युनिख, स्वित्झर्लंड, ब्रिटनमधील न्यू यॉर्कशॉयर आणि ब्रिस्टल तसेच इटली आणि स्पेनमधून आले आहेत. इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) एनजीओंना भारतविरोधी प्रचार करण्यासाठी परदेशातून पैसे मिळत आहेत यावर अहवाल दिला होता. त्यानंतर असा प्रकार झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.