शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बड्या व्यापा-यांवर पोलिसांची नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 05:30 IST

नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या

आलापल्ली (गडचिरोली) : नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या. यातूनच सोमवारी आलापल्ली येथील धान्य व्यापारी परशुराम डोंगरे याला सव्वा कोटीच्या संशयास्पद व्यवहारप्रकरणी अटक झाल्यानंतर पोलिसांच्या नजरा अजून काही व्यापाºयांवर खिळल्या आहेत.नोटाबंदीपूर्वीच्या काळात आलापल्ली परिसरातील बरेचशे व्यापारी बँकांमार्फत आर्थिक व्यवहार करीत नव्हते; मात्र नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर व्यापाºयांना बँकेत धाव घ्यावी लागली. यादरम्यान नक्षलवाद्यांचा काळा पैसा पांढरा करण्याच्या हेतूने स्वत:च्या बँक खात्यात पैसे जमा करणाºया अहेरी उपविभागातील बड्या व्यापाºयांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे बडे व्यापारी धास्तावले आहेत. सोमवारी अटक केलेल्या परशुराम डोंगरेचे बँक आॅफ महाराष्टÑमधील खाते पोलिसांनी काही महिन्यांपूर्वीच गोठविले होते, अशी माहिती पुढे आली आहे.डोंगरे हा अंकित ट्रेडर्स या नावाने धान्याचा व्यापार करीत असला तरी आलापल्ली वनविभागांतर्गत पेरमिली वन परिक्षेत्रातील मेडपल्ली व बुर्गी येथील दोन तेंदू युनिटही त्याने खरेदी केले होते. तसेच भामरागड वन विभागांतर्गत ताडगाव वन परिक्षेत्रातील बोटनफुंडी येथील एक तेंदू युनिट खरेदी केला होता. दरम्यान, त्याचे बँक खाते गोठविण्यात आल्याने येथील तेंदूपत्ता मजुरांना तेंदू संकलनाची रक्कम (मजुरी) अद्यापही प्राप्त झालेली नाही, अशी माहिती उजेडात आली आहे. यामुळे मजुरी कधी मिळणार? या चिंतेत मजूर सापडले आहेत.नोटाबंदीनंतरच्या काळातील बँकांमधल्या आर्थिक व्यवहारांवर आयकर विभागासोबत पोलिसांचीही करडी नजर होती. काही व्यापाºयांच्या बँक खात्यावर अतिरिक्त रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून, बडे व्यापारीही अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.