शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडी की मृत्यूचे सापळे?

By admin | Updated: December 28, 2015 03:50 IST

पोलिसांची कोठडी ही सर्वाधिक सुरक्षित असल्याचा समज आता खोटा ठरत चालला आहे. गेल्या आठ वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांच्या तपासासाठी आणलेल्या तब्बल २५५ संशयित आरोपींचा मृत्यू झाला आहे.

जमीर काझी,  मुंबईपोलिसांची कोठडी ही सर्वाधिक सुरक्षित असल्याचा समज आता खोटा ठरत चालला आहे. गेल्या आठ वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांच्या तपासासाठी आणलेल्या तब्बल २५५ संशयित आरोपींचा मृत्यू झाला आहे. या वर्षात आॅक्टोबर अखेरपर्यंत तब्बल ३१ जणांनी कोठडीत अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे पोलीस कोठडी हे मृत्यूचे सापळे बनले आहेत, अशी टीका मानवाधिकार संघटनेतील कार्यकर्त्यांकडून होत आहे.पोलिसांनी तपासासाठी आणलेल्या दबावामुळे कुणी रक्तदाब वाढल्याने, कोणी हृदयविकाराच्या धक्याने, तर अनेक जण जुन्या व्याधीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, ताब्यात घेतले असताना मृत्यू झाल्याने, त्याचे ‘पाप’ पोलिसांच्या माथ्यावर फुटत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह विविध उपाययोजना राबविण्यात येत असली, तरी त्याला मर्यादा येत असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांच्या ताब्यात असताना, संशयिताचा मृत्यू झालेल्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी)कडून केला जातो. मात्र, त्याच्या तपासाची कासवगतीमुळे बहुतांश प्रकरणाचा तपास प्रलंबित असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला गुन्ह्याबाबत तपासासाठी अटक केली अथवा ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याशी करावयाची वर्तणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मानवी हक्काबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. २४ तासांच्या आत वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर करणे, त्यांच्या नातेवाईकांना कळविणे आदी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली जात असली, तरी अनेक वेळा सराईत गुन्हेगाराकडून माहिती काढून घेण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला जातो. गेल्या आठ वर्षांमध्ये पोलीस कोठडीत एकूण २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जातो. त्यानुसार या प्रकरणाची माहिती दिल्लीतील राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य सरकार व पोलीस महासंचालकांकडे पाठविली जाते. या प्रकरणी नागरी हक्क व संरक्षण विभागाचे अप्पर महासंचालक समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले जाते. मात्र, गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोठडीतील मृत्यूबाबतची बहुतांश प्रकरणी अद्याप तपासात रखडलेली आहे. अपुरे मनुष्यबळ व अन्य कामामुळे याबाबत तपास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.राज्याचे पोलीसप्रमुख प्रवीण दीक्षित हे सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रशिक्षण व खास पथक विभागात ‘एडीजी’ म्हणून कार्यरत असताना, पोलिसांना मानवी हक्काबाबत योग्य मार्गदर्शनासाठी विशेष उपक्रम राबविण्याचे सूचविले होते. त्याबाबत स्वतंत्र पुस्तिकाही बनविली होती. मात्र, तरीही कोठडीतील मृत्यूचे प्रमाण वाढत राहिले. आता तेच पोलीस दलाचे प्रमुख असल्याने त्यांनी पोलिसांनी मार्गदर्शन तत्त्वाची अंमलबजावणी करावी, यासाठी ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे..