शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, चालकांत धुमश्चक्री

By admin | Updated: January 19, 2015 04:33 IST

कलमार आॅपरेटर्सच्या संपामुळे आधीच बेजार झालेल्या कंटेनर चालकांचा रविवारी पोलिसांशी वाद झाला. याचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले

उरण : कलमार आॅपरेटर्सच्या संपामुळे आधीच बेजार झालेल्या कंटेनर चालकांचा रविवारी पोलिसांशी वाद झाला. याचे रूपांतर धुमश्चक्रीत झाले. पोलिसांचा लाठीमार आणि चालकांच्या दगडफेकीमुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनचालकांनी पोलिसांची जीप उलटूवन तिला आग लावली.इतक्यावरच न थांबता वाहनचालकांनी मदतीला येणाऱ्या पोलिसांना रोखण्यासाठी पोर्ट युजर्स इमारतीच्या चौकाजवळ टायर, लाकडे टाकून अडथळा निर्माण केला. तासभर चाललेल्या गंभीर प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या एसीपीच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांनी काही वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे.वातावरण गंभीर असतानाच पोलीस आणि वाहन चालकांत शाब्दिक बाचाबाची झाली. यात पोलिसांच्या मारहाणीने भर पडली. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या संतप्त वाहनचालकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. उभी असलेली जीप वाहनचालकांनी उलटून पेटवून दिली. पोलिसांनी जादा कुमक मागवली. मात्र त्यांच्या वाटेतही वाहनचालकांनी अडथळा निर्माण केला. जादा पोलीस कुमक पोहोचताच वाहनचालकांनी पोबारा केला. पोलिसांनी काही वाहनचालकांना ताब्यात घेतले.वाहनचालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी हुज्जत आणि कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. वाहनचालकांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. वाहनाला आग लावली. दगडफेकीत पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाल्याची माहिती एसीपी शशिकांत बोराटे यांनी दिली. पोलिसांनी आधी वाहनचालकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे संतप्त चालकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि काही शिपिंग कंपनीच्या एजंटांनी दिली. पोलीस आणि वाहनचालकांमधील तासाभराच्या धुमचक्रीमुळे वातावरण चिघळले आहे. सध्या पोलिसांनी घटनस्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ केल्याने परिसरात शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)