ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ८ - कल्याणमध्ये गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरु असताना मंगळवारी रात्री तिसगाव नाका परिसरात ही घटना घडली. तिसगाव नाक्यावर तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना जरीमरी मंडळाच्या चार कार्यकर्त्यांनी बुडवून मारण्याचा प्रयत्न केला.
गणेश विसर्जनावरुन डगळे आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी डगळे यांना पाण्यात ढकलून त्यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला.