शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

By admin | Updated: July 1, 2016 04:16 IST

ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले

ठाणे : ठाण्यातील चेकमेट या कंपनीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील चोरटे पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून तपासासाठी वागळे इस्टेट पोलिसांसह गुन्हे शाखेची १० पथके राज्यासह परराज्यांतदेखील शोध घेत आहेत. गुन्हा घडल्यानंतर घटनेची माहिती एक तासाने पोलिसांना मिळाल्याने दरोडेखोरांना पलायन करण्यास वेळ मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या दरोड्यात कंपनीतीलच कुणी घरभेदी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून पोलिसांनी आतापर्यंत चार ते पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यात ठाण्यातील बाळकुम परिसरातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडून दरोड्यात गेलेली काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून ती किती आहे, याची माहिती मिळू शकली नाही. हा दरोडा पडत असताना कंपनीत दोघे सुरक्षारक्षक आणि १७ कर्मचारी कार्यरत होते. यातील पहिल्या गेटवर रामचंद्र कोरी, तर आतल्या बेसमेंटच्या गेटवर पवार हे सुरक्षारक्षक होते. पहिल्या गेटमधून माकडटोपी परिधान केलेले तिघे आणि रु मालाने तोंड झाकलेल्या एकाची छबी कंपनीतील स्क्रीनवर दिसल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काहीच दक्षता कशी घेतली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच दरोड्यानंतर तब्बल एक तासाने पोलिसांना कळवल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच चोरट्यांना ठाणे शहराबाहेर पळून जाण्यास वाव मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)>मोबाइल डीसीआयद्वारे चोरांचा शोध सुरुदरोडेखोर कंपनीतून मुद्देमालासह बाहेर पडल्यानंतर पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. यात ३० ते ३५ वयोगटांतील चार चोरटे खांद्यावर ड्रम घेऊन रस्त्यावर पळताना दिसत आहेत. याशिवाय, चोरट्यांनी लांबवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाच मोबाइलचा डीसीआर काढून त्याद्वारे चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. याबाबत, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकूण ९ कोटी १६ लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे सांगितले. मात्र, नक्की कितीची लूट झाली, याचा संभ्रम कायम आहे. तर, पोलिसांनी ८५ कर्मचाऱ्यांची चौकशी करून रात्री उशिरा चार जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. परंतु, याविषयीची अधिक माहिती मात्र मिळू शकलेली नाही.