शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस खात्याची खरेदी रखडली

By admin | Updated: January 1, 2015 03:36 IST

दहशतवादी हल्ल्यांचे इशारे गुप्तचरांकडून वारंवार मिळाल्यानंतरही राज्य पोलीस दलात गेल्या दीड वर्षात नवी शस्त्रास्त्रे, दारुगोळा किंवा बुलेटप्रूफ जॅकेट्स अशी कोणतीही सामग्री दाखल झालेली नाही

डिप्पी वांकाणी - मुंबई दहशतवादी हल्ल्यांचे इशारे गुप्तचरांकडून वारंवार मिळाल्यानंतरही राज्य पोलीस दलात गेल्या दीड वर्षात नवी शस्त्रास्त्रे, दारुगोळा किंवा बुलेटप्रूफ जॅकेट्स अशी कोणतीही सामग्री दाखल झालेली नाही. पोलीस महासंचालकांचे कार्यालय आणि गृह खात्याच्या कलगीतुऱ्यात पोलीस दलाचे आधुनिकीकरण मागे पडले आहे. किंबहुना या संघर्षापायी पोलिसांसाठी अत्यावश्यक असलेली सामग्री खरेदी गोठली आहे. राज्य दहशतवादविरोधी दलातील (एटीएस) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले, की राज्य सरकारला आम्ही सुचवलेल्या यादीतील एकही वस्तू आम्हाला अद्याप मिळालेली नाही. बुलेटप्रूफ जॅकेट्ससारख्या वस्तू आम्ही वारंवार मागूनही मिळालेल्या नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि गृह खात्यात असलेला बेबनाव. दोन्ही कार्यालयांदरम्यान चाललेल्या कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारामुळे सर्व योजना कागदावरच राहिल्या आहेत. पोलीस महासंचालक आणि गृह व अर्थ खात्याचे सचिव यांच्यात सुसंवाद नाही. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक बाबींवर त्यांच्यात ताळमेळ नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहे आणि फायलींवर वेगवेगळे शेरे मारण्यात प्रत्येक जण धन्यता मानत आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले, की महासंचालक यांच्या कार्यपद्धतीवरून बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत, की त्यांचे कामासंबंधीचे वार्षिक गोपनीय अहवाल विनाकारण खराब केले जात आहेत. आणखी तीन अधिकारी दयाळविरोधात तक्रार देण्याच्या बेतात होते. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिवाळी अधिवेशन संपल्यावर त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याबद्दल आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी तो बेत रद्द केला. दयाळ यांनी या तिघांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना या तिघांना डावलून थेट आपल्याला रिपोर्ट करण्यास सांगितल्याने त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यासारखे वाटत होते.