शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या सुरक्षेला पोलिसांची नकारघंटा !

By admin | Updated: June 24, 2014 00:58 IST

महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी

अधिकाऱ्यांचा तुटवडा : गृहविभागाचे दुर्लक्ष नागपूर : महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी कार्य करण्यास अनिच्छुक आहे. वाहतुकीच्या तुलनेत पोलीस दलाची यंत्रणा कमकुवत आहे. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून एक पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांची मंजुरी आहे. मात्र विदर्भात महामार्ग पोलिसांक डे अधीक्षक आणि उपअधीक्षकही नाही. पीआयकडे प्रभारी डीवायएसपीची जबाबदारी आहे. नागपूर विभागात नऊ पोलीस चौकी आहे. प्रत्येक पोलीस चौकीकडे २०० किलोमीटर क्षेत्राची जबाबदारी आहे. प्रत्येक चौकीत एक एपीआय, तीन पीएसआय व अन्य पोलीस शिपाई अशा २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक चौकीत ५० टक्केही कर्मचारी नाही. प्रत्येक चौकीकडे फक्त एकच वाहन आहे. अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक जाम झाल्यास सुरळीत करणे, वाहनात बिघाड असल्यास चालान करणे, या जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात. नियमांकडे दुर्लक्ष औद्योगीकरणामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या वाहतुकीबरोबरच महामार्गावर सुधारणाही करण्यात आल्या आहे. दुपदरी असलेले महामार्ग सहा पदरी झाले आहे. वाहतूक सुरळीत होईल, अपघात कमी होती, अशी अपेक्षा होती. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली. नागपुरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोलकाता - मुंबई आणि महामार्ग क्रमांक ७ जबलपूर - हैद्राबाद जातो. विदर्भातील कोळशाच्या खाणी, औद्योगीकरण, प्रवासी वाहतूक आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सीमा जवळ असल्याने, जड वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. (प्रतिनिधी)