शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: May 16, 2017 18:50 IST

ढोल ताशा या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 16 - ढोल ताशा या चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चौघांना पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी आणि आणखी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पत्नी आणि एक जण अद्यापही फरार आहे. अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केल्याचं परिमंडळ 1चे उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितलं आहे.ढोल ताशा चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी सोमवारी फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि त्यानंतर विष पिऊन आत्महत्या केली होती. चित्रपट व्यवसायात नुकसान झाल्यानं पत्नी प्रियंका, तिचे भाऊ, मैत्रिणींनी छळ होत असल्यानं आत्महत्या करत असल्याचंही ते म्हणाले होते. या प्रकरणात पोलिसांनी कल्याण रामदास गव्हाणे आणि बापू किसन ठिगळे यांना आज पहाटे चारच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची पत्नी आणि फरार असलेल्या आणखी एकाचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, तापकीर यांनी कर्वे रोडवरील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्टही लिहिली होती. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती व्यवसायात नुकसान झाल्यानंतरची कहाणी सांगितली होती. पत्नी मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.