अहमदनगर : राहुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल ज्ञानदेव बन्सीलाल वाघमारे याला शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़ राहुुरी येथील तक्रारदाराची पत्नी व मुलगा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ या दोघांना अटक न करण्यासाठी वाघमारे याने त्यांच्याकडे सहा हजार रुपयांची मागणी केली होती़ तडजोडीअंती चार हजार रुपये देणे निश्चित झाले़ शनिवारी तक्रादार याने वाघमारे याला चार हजार रुपये देताच सापळा लावून बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला पंच-साक्षीदारांसमवेत रंगेहाथ पकडले़ (प्रतिनिधी)
पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना पकडले
By admin | Updated: February 5, 2017 01:36 IST