शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन पोलिसाची आत्महत्या

By admin | Updated: September 19, 2016 00:34 IST

एका पोलीस कर्मचाऱ्याने घरामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

पुणे : वाहतूक शाखेच्या कोंढवा विभागात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घरामध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. विशेष म्हणजे हा पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयाच्या फुटबॉल संघाचा खेळाडू होता. राजेश गणेश माळशेकर (वय ३६, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. माळशेकर यांचे लग्न झालेले असून, काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले गावी राहण्यास गेले होते. त्यांच्या घरातील नळ सुरू राहिल्यामुळे पाणी वाया जात होते. त्यांच्या शेजाऱ्याने माळशेकर यांचे दार वाजवले. बराच वेळ प्रयत्न करूनही घरामधून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.