शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला तरुणाची बेदम मारहाण

By admin | Updated: September 17, 2016 01:28 IST

विसर्जन मिरवणूक मार्गामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली.

पुणे : विसर्जन मिरवणूक मार्गामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. टिळक चौकामध्ये रात्री बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये पोलीस कर्मचारी विजयकुमार पाटणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोळ्याखाली जखम झाली असून चेहऱ्यावर सुज आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याचे दोन साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. विनायक जांभुळकर असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणे गुरुवारी रात्री टिळक चौकामध्ये बंदोबस्त करीत होते. जांभुळकर आणि त्याचे दोन साथीदार गर्दीमध्ये घुसून गोंधळ घालीत मिरवणूक मार्गामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना पाटणे यांनी लोकांना त्रास देऊ नका, नीट मिरवणूक बघा, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. पाटणेंच्या अंगावर धावून जात जांभुळकरने त्यांना धडकले. लोखंडी बॅरिकेडवर पडल्याने त्यांच्या डोळ्याच्या खाली मार लागला. पाटणे यांनी त्यांना पकडून संभाजी चौकीमध्ये नेले. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जखमी सहायक फ ौजदाराचे निधनपिंपरी : गणेशोत्सवादरम्यान मोशी टोलनाक्यावर नाकाबंदी लावून तपासणी करीत असताना दुचाकीवरून भरधाव आलेल्या अनोळखी तिघा जणांनी धडक देऊन जखमी केलेले सहायक फ ौजदार सुरेश रामू चपटे (वय ४९, रा़ इंद्रायणीनगर पोलीस वसाहत, मूळ गाव चपटेवस्ती, भीमाशंकर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ही घटना ११ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचला मोशी टोलनाक्यावर घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान मोशी टोलनाक्यावर सहायक फ ौजदार चपटे कार्यरत होते़ रविवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्यादरम्यान दुचाकीवर तिघे जण भरधाव येताना पोलिसांना दिसले़ त्यांना थांबविण्यासाठी चपटे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला़ मात्र, दुचाकी भरधाव चालवून तिघांनी चपटे यांना धडक दिली़ यात ते गंभीर जखमी झाले़ आरोपी पळून गेले़ उपचारासाठी चपटे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चपटे यांचे बुधवारी (दि. १४) निधन झाले़ अनोळखी तिघांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक ए़ पी़ धुमाळ अधिक तपास करीत आहेत़