शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गांजे येथे प्रेत ताब्यात घेण्यावरून पोलिसांना धक्काबुक्की

By admin | Updated: April 18, 2017 05:54 IST

गांजे येथील स्मशानभूमीत गावकरी शरद पराडचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तेथील गावकऱ्यांनी धक्काबुक्की केली

मनोर : गांजे येथील स्मशानभूमीत गावकरी शरद पराडचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तेथील गावकऱ्यांनी धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गांजे गावातील पाचशेच्यावर अनोळखींवर मनोर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजे गावाजवळील जंगलामध्ये शनिवारी रात्री गावकरी शिकार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी रानडुकरावर मारलेल्या गोळीचा नेम चुकुन ती शरद पराडला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही खबर एटीएसकडून मनोर पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते गावात पोहोचले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना गराडा घालून प्रेत ताब्यात घेण्यास अडथळा आणला. ताफ्यात मनुष्यबळ कमी असल्याने गावकऱ्यांपुढे त्यांचे काही चालले नाही. दरम्यान, गावकऱ्यांनी नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीत प्रेताचे दहन केले. रविवारी सकाळी पुन्हा नदीकाठी स्मशानभूमीजवळ पोलीस गेले असता, तिथे प्रेताचे कुठलेही पुरावे सापडले नाही. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील पाचशेपेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल केला असून हा खून चुकून फायरिंगमध्ये झाला? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)